01022
अस्मिता दिंडे
नेर्ले सरपंचपदी
अस्मिता दिंडे
भेडसगाव, ता. २७ : नेर्ले (ता. शाहूवाडी) येथील सरपंचपदी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या अस्मिता दिलीप दिंडे यांची बिनविरोध निवड झाली. या निवड सभेच्या अध्यक्षस्थानी मंडल अधिकारी शिवाजी पन्हाळे होते.
सत्तारुढ आघाडीच्या मावळत्या सरपंच वर्षा पाटील यांनी पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर अस्मिता दिंडे यांची निवड झाली. निवडीनंतर सरपंच दिंडे यांचा शिवसेना ठाकरे गटाचे अमरसिंह पाटील, माजी सरपंच महिपती दिंडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. निवडीनंतर समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करत गुलालाची उधळण केली. यावेळी तानाजी पाटील, प्रशांत कांबळे, मानसिंग घोडे पाटील, यशवंत दिंडे, सागर दिंडे, राजू दिंडे, शिवाजी दिंडे, पांडुरंग डांगे, राजू डांगे, जगन्नाथ पाटील, आण्णा पाटील, शिवाजी पाटील, युवराज पाटील, योगेश पाटील, किशोर पाटील, रोहित पाटील, तसेच माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामसेवक विजय पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. संतोष कांबळे यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.