कोल्हापूर

भुयेवाडी येथे गटारीची दुरवस्था .

CD

01520
भुयेवाडीतील गटारी
साफ करण्याची गरज
भुये, ता.११ : भुयेवाडी (ता. करवीर) येथील गावामध्ये अनेक महिन्यांपासून गावातील गटारीकडे ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केले आहे. संपूर्ण गावातील गटारी तुंबलेल्या आहेत. ग्रामपंचायतीने याकडे दुर्लक्ष केले आहे.
भुयेवाडीची लोकसंख्या सहा हजार आहे. गावामध्ये एकच सफाई कामगार आहे. तीही महिला. त्यामुळे एक महिला संपूर्ण गावची गटार साफ करू शकत नाही. यासाठी ग्रामपंचायतीने सफाई कामगार भरणे आवश्यक आहे. सांडपाण्याची कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे गावांतील सांडपाणी गटारीमध्ये जाते. त्यामुळे गटारी तुडुंब भरलेल्या आहेत. गटारी तुंबल्यामुळे डास, जंतू, कीटक, वास यांच्या मुळे गावात दुर्गंधी पसरलेली आहे. आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. घाणीचे साम्राज्य वाढल्यामुळे रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. वयस्क माणसे व लहान मुलांवर याचा परिणाम होणार आहे. विशेष म्हणजे जेथे ग्रामपंचायतीची इमारत आहे त्यासमोरील गटारी घाणीने तुडुंब भरलेल्या आहेत. सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी साफ दुर्लक्ष केले आहे. घाणीच्या साम्राज्या वाढल्यामुळे डासांची पैदास वाढलेली आहे. ग्रामपंचायतीने सफाई कामगार वाढवून गटारी स्वच्छ कराव्यात, अशी मागणी लोकांकडून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market AI Rules: शेअर बाजारात AI च्या मदतीने ट्रेडिंग करताय? थांबा! गुंतवणुकीबाबत SEBIचा मोठा इशारा; जाणून घ्या नवे नियम

Koyna Dam Water level Update : महाबळेश्वर, नवजा अन् कोयनेत दमदार हजेरी; गेल्या 12 तासांत 'इतक्या' मिमी पावसाची नोंद, धरणाची स्थिती काय?

Latest Marathi News Live Update : उत्तराखंडमध्ये पावसाचा तडाखा; बद्रीनाथ मार्गावर दरड कोसळून महाराष्ट्रातील भाविक अडकले

'वॉर्नरलाही जेजुरीचा भंडारा लावला होता' देवदत्त नागेने सांगितला परदेशातील भन्नाट किस्सा

Kolhapur ACB Trap : शाहूवाडीत PWD च्या शाखा अभियंत्याला 38 हजारांची लाच घेताना रंगेहात अटक; 'या' कामाच्या बिलासाठी मागितली होती रक्कम

SCROLL FOR NEXT