कोल्हापूर

निगवेतील पुलावरील रस्त्याची दुरवस्था - वाहनांची कसरत, अपघाताचा धोका

CD

01526
निगवे दुमालातील पुलावरील
रस्त्यावर खड्डेच खड्डे

सकाळ वृत्तसेवा

भुये, ता. १३ : निगवे दुमाला (ता. करवीर) येथील पुलावरील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. तात्पुरता मुरूम टाकून डागडुजी केल्यामुळे पुन्हा पुलावरील रस्ता उखडला आहे. त्यामुळे वाहतुकीस धोका निर्माण झाला आहे.
निगवे दुमालातील पुलावरील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. वारंवार तक्रार करूनदेखील सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे. पावसाळा जवळ आल्यामुळे आणि मुरूम उघडल्यामुळे पुलावर चिखल होऊन गाड्या घसरण्याची होण्याची शक्यता आहे. मुरूम उखडला गेल्यामुळे जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे गाडी चालवताना कसरत करावी लागते. रात्रीच्या वेळी मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. वडणगे, निगवे, भुयेवाडी, भुये, जठारवाडी हा रस्ता महामार्गाला जोडल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढली आहे. या मार्गावर जड वाहतुक वाढल्यामुळे रस्ता उखडला गेला आहे. तसेच मलकापूर, बांबवडे मार्गे येणारी वाहतूकदेखील याच मार्गाने जाते. क्रेशरचा कारखाना असल्यामुळे डंपरचीही वाहतूक वाढली आहे. पावसाळ्यामध्ये चिखल होऊन दोनचाकी गाड्या घसरून अपघात होण्याची शक्यता आहे. पुलावर काही ठिकाणी कठडे नसल्यामुळे रात्रीच्या वेळी पुलावरून वाहन ओढ्यात जाऊ शकते. त्यामुळे अपघात टाळण्यासाठी पावसाळ्यापूर्वी रस्ता करावा; अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Social Media Election Rules : निवडणूक प्रचारात डीपफेक व्हिडिओ वापराल तर कारवाई; आयोगाचे राजकीय पक्षांना कडक निर्देश

Central Railway: मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली! कसाऱ्याकडे जाणाऱ्या लोकल ठप्प, ४५ मिनिटं प्रवाशांचा खोळंबा

'मी जे केलं ते तुम्ही करू नका...' सिंगल मदरहुडबद्दल नीना गुप्तांचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाल्या...

Chanakya Niti: नशीब बदलत नाही म्हणून निराश आहात? चाणक्य नीतीतील ‘या’ २ सवयी आजपासून अंगीकारा!

Marathi News Live Updates : अरविंद केजरीवाल यांची 'गोवा फॉरवर्ड पार्टी' आणि 'आम आदमी पार्टी' च्या युतीची घोषणा

SCROLL FOR NEXT