कोल्हापूर

भुये येथील भैरोबा देवराई फुलवूया .

CD

01529

चला, भैरोबा माळावर देवराई फुलवूया..
ग्रामस्थांना आवाहन; भैरोबा वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन समितीची धडपड

सकाळ वृत्तसेवा

भुये, ता. १५ : भुये (ता. करवीर) येथील भैरोबा परिसरात वृक्षारोपण करून परिसर हिरवाईने नटवण्यासाठी भुये व भुयेवाडी गावातील भैरोबा फक्त प्रयत्नशील आहेत. सामाजिक कार्य म्हणून व गावचा परिसर फुलवण्यासाठी सर्वांनी मिळून योगदान द्यावे, असे आवाहन भैरोबा वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन समिती भुये व भुयेवाडी यांच्यावतीने केले आहे.

याठिकाणी काही काही झाडे लावले आहेत. झाडांना पाणी देण्यासाठी दानशूर व्यक्तींना ठिबक सिंचनासाठी आवाहन केले होते. फारसा प्रतिसाद मिळाला नाही. तरीदेखील पाणी देऊन झाडांना जीवदान देण्याचा प्रयत्न केला. परिसरात तळ्याशेजारी १५० झाडे आहेत. लोकांना सावली व ऑक्सीजन मिळावे यासाठी हा प्रयत्न केला. तसेच हंगामात जी फळे घरी आणाल त्याच्या बिया आमच्याकडे एकत्र साठवून द्याव्यात किंवा साठवलेल्या तळ्याकाठी व भैरोबा मंदिरासमोर फळझाडांची झाडे परिसरात तयार खड्ड्यात या बिया स्वतः लावाव्यात किंवा परिसर फुलवण्यासाठी फळाचे रोप द्यावे. म्हणजे ही झाडे पावसाळ्यात उगवून येतील. कै. ज्ञानू धोंडी पाटील हायस्कूलच्या मुलांनाही आवाहन केले आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने फळांच्या बिया गोळा करून शाळेत ठेवलेल्या बॉक्समध्ये बॉक्समध्ये ठेवाव्यात. याची अंमलबजावणी झाल्यास काही वर्षांत तळ्याच्या काठावर फळझाडांची देवराई तयार होईल. भैरोबा माळावर तळ्याकाठी फळझाडांची सुंदर देवराई तयार करण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे; असे आवाहन भैरोबा वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन समिती भुये व भुयेवाडीतर्फे केले आहे.

कोट
भैरोबा मंदिर व तळ्याच्या काठावर वनराईबरोबरच फळांची झाडे लावण्यासाठी प्रत्येकाने सहकार्य करावे. प्रत्येक घरात फळांच्या बिया रुजवून रोपे तयार करावी व ती रोपे लावावीत. - - अमर पाटील, वृक्षप्रेमी भुये

तळ्याकाठी फळाची झाडे लावल्यामुळे सर्वांना लाभ होईल. गावातील जुन्या पारा जवळ बियांचे नियोजन करण्यासाठी बॉक्स ठेवण्यात येणार आहे.तसेच शालेय विद्यार्थी व महिलांनी या बॉक्समध्ये घराच साठवलेल्या फळांच्या बिया ठेवाव्यात.
- दीपक पाटील, सामाजिक कार्यकर्ते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketan Agrawal Murder Case : केतनला धक्का कोणी दिला? पक्का पुरावाच नाही; पोलिसांनी कोर्टाकडे मागितली सियाच्या 'लाय डिटेक्टर' चाचणीची परवानगी

मुंबईसे वांद्रे कैसे जाते है? थेट पाकिस्तानमधून फोन आल्यानं खळबळ, पोलिसांकडून चौकशी सुरू

Shardul Thakur: शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली माझ्यासोबत अन्याय झाला! शार्दुल ठाकूरचा थेट आरोप; टीम इंडियाबाबत केला मोठा खुलासा

'तुझे केस विचित्र आहेत' ऑडिशनवेळी मंदार जाधवला दिलेलं रिजेक्शनचं विचित्र कारण, म्हणाला...

Amol Kolhe leaving Sharad Pawar : खासदार अमोल कोल्हे शरद पवारांची साथ सोडणार?; 'महायुतीकडून ऑफर आल्यास विचार करू'

SCROLL FOR NEXT