01676
भुयेवाडीत शेती कार्यशाळा
भुये, ता. ३ : भुयेवाडी (ता. करवीर) येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ; राहुरी अंतर्गत राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी विद्यालय, कोल्हापूर येथील कृषिदूतांमार्फत विविध प्रात्यक्षिकांचे आधारे शेतकऱ्यांची कार्यशाळा झाली. बॉडी पेस्ट तयार करणे व रासायनिक व जैविक बीजक्रिया उद्यानाविद्यामध्ये कलम करण्याच्या पद्धती व फळबागांसाठी खड्डे, प्रात्यक्षिके तसेच कीटकशास्त्रामध्ये रासायनिक औषधे फवारणी, मेटारायझियमची उसामध्ये आळवणी व एकात्मिक कीड नियंत्रण, तसेच पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभागामध्ये गोठ्याची सफाई व निर्जंतुकीकरण व जनावरांच्या लसीकरणाविषयी मोहीम तसेच अर्थशास्त्रात कर्ज प्रस्ताव तयार करणे, शेतीमाल विक्रीसाठी उपयुक्त मोबाईल ॲप्स, कृषी विस्तारमध्ये हुमणी कीड नियंत्रणावर व्याख्यान, शेतकरी ग्रुप तयार करणे, तसेच मृदा शास्त्रामध्ये फळ विकासासाठी खतांची योग्य मात्रा व सूक्ष्म अन्नद्रवे फवारणी प्रक्रिया, कृषी शास्त्रामध्ये एकात्मिक तणनियंत्रण व बीजमृत तयार करणे तसेच कृषी अभियांत्रिकीमध्ये शुन्यदर्जेवर आधारित शीतगृहे, पपईपासून जाम तयार करणे आदींविषयी कृषिदूत श्रेयस पाटील, अनिकेत पिंगळे, शुभम राजमाने, आशीष राजमोर, श्लोक डोंगरे, प्रदीप डाके यांनी मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. आर. डी. बनसोडे, डॉ. बी. टी. कोलगणे, एस. एस. शेंडे, अमर उरुणकर, शेतकरी बांधव उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.