कोल्हापूर

खोतवाडीत वनविभागाची बैठक

CD

02011
खोतवाडी : येथे ग्रामस्थांच्या बैठकीत बोलताना मेहबूब नायकवडी.

खोतवाडीत वन विभागाची बैठक
बांबवडे, ता. ६ : खोतवाडी (ता. शाहूवाडी) येथे बिबट्याचे दर्शन झाल्याची बातमी दैनिक ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाली होती. या पार्श्‍वभूमीवर वन विभागाने तातडीची बैठक घेतली. येथील शेतकऱ्यांशी थेट संपर्क साधला. यावेळी परिमंडल वन अधिकारी मेहबूब नायकवडी यांनी गावास भेट दिली. त्यांनी बिबट्यासह अन्य वन्यप्राणी यांच्या अधिवासामध्ये बाधा निर्माण केल्यास कायदेशीर बाबींची माहिती दिली. त्यांच्यापासून सावध व सतर्क राहून उपाय योजनांची माहिती दिली. जर वन्यप्राणी दिसला तर त्याची वन विभागाला माहिती द्या. त्या भागात जाणे टाळा, गोठा बंदिस्त व प्रखर प्रकाशमय ठेवा, भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा, मुलांना एकटे बाहेर सोडून नका, शिट्टी जवळ ठेवा, मोबाईलवर मोठ्या आवाजात गाणी लावा, अशा सूचना नायकवडी यांनी दिल्या. यावेळी वनरक्षक रूपाली पाटील, सरपंच नामदेव खोत, पोलिसपाटील कोळापटे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain: आळंदीतील पूरस्थितीमुळे वारकऱ्यांसाठी पुण्यात मोठी व्यवस्था! पुढील पाच दिवस पाणी कपात देखील रद्द, महापालिकेचा मोठा निर्णय!

Koyna Dam Update : अवघ्या काही तासांत कोयना धरणाचा पाणीसाठा 30 TMC पार; पुढील 24 तास 'हायअलर्ट', गावांना दरडीचा धोका, धरण प्रशासनाचा मोठा इशारा

Latest Marathi News Update: मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक ३० तासांनी पूर्ववत

Pune Dam Water Level Rises : खडकवासला धरण वेगाने भरतंय... पुढचे काही तास ठरणार निर्णायक? प्रशासनाने नागरिकांना दिला महत्त्वाचा इशारा

सोलापूर विद्यापीठाची २९ सप्टेंबरपासून परीक्षा! विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी अडीच महिने आधी वेळापत्रक जाहीर, वर्गांत सीसीटीव्ही, ७५ टक्के हजेरीचे बंधन, वाचा...

SCROLL FOR NEXT