कोल्हापूर

आंबवडे येथे एस.टी. थांबत नसल्याने प्रवाशांची गैरसोय

CD

आंबवडेत एस.टी. थांबत
नसल्याने प्रवाशांची गैरसोय
बोरपाडळे : कोल्हापूर ते रत्नागिरी मार्गावरील आंबवडे (ता. पन्हाळा) येथून कोल्हापूरकडे नोकरी, शिक्षण आणि इतर व्यवसायासाठी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या खूप आहे. सकाळी कामावर वा शिक्षण व इतर कामासाठी जाणाऱ्या व संध्याकाळी परतणाऱ्या प्रवाशांना त्रास होत आहे. मलकापूर डेपोकडून येणाऱ्या गाड्या फुल्ल भरून येत असल्याने ताटकळत उभे राहावे लागते. यामध्ये शाळकरी मुले व महिलांसह ज्येष्ठ नागरिकांना त्रास होत असल्याचे माजी उपसरपंच भाऊसाहेब मोहिते यांनी सांगितले. कोल्हापूरहून परततानाही टाऊन हॉल, रेल्वे स्टेशन व मध्यवर्ती बसस्थानकात असाच त्रास प्रवाशांना होत असल्याचे अमोल मोरे यांनी सांगितले. एस.टी.प्रशासनाने दखल घेत गाड्यांच्या फेऱ्या वाढवाव्यात; अशी आंबवडेसह मिठारवाडी, नावली, देवाळे, पैजारवाडी येथील प्रवाशांची मागणी आहे. याबाबत मिठारवाडीतील बाबासाहेब जगताप म्हणाले, ‘ महाशिवरात्री यात्रेच्या तिसऱ्यादिवशी मी पत्नीसह पुण्याला जाण्यासाठी आंबवडे थांब्यावर आलो. सकाळी दहा ते साडेअकरापर्यंत तब्बल दीड तास उभे होतो. रस्त्यावरील धुळीने खूप त्रास झाला. एस.टी. लवकर न मिळाल्याने नाहक त्रास झाला. प्रशासनाने लक्ष घालावे.’
-

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडविरुद्ध विश्वविक्रमी शतक केल्यानंतर शुभमन गिलचं नाव घेत म्हणतोय, आता लक्ष्य २०० धावा; VIDEO

Crime News: "ऐका! आता मी शारीरिक संबंध ठेवणार नाही, माझ्या नवऱ्याला...", प्रियकर मानलाच नाही शेवटी असा धडा शिकवला की...

Thane Politics: पुलाचे घाईत उद्घाटन, चालकांचा जीव धोक्यात, गुन्हा दाखल करा; ठाकरे गट आक्रमक

संतापजनक घटना! 'फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून महिलेवर अत्याचार'; उरुळी कांचन पोलिसांकडून दोघांना अटक

Pune Accident: 'आषाढी एकादशी दिवशीच पती-पत्नीचा अपघाती मृत्यू'; वारीवरून परतत असताना काळाचा घाला, परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT