कोल्हापूर

क्रीडा वृत्त माले ता.पन्हाळा

CD

मैदानाबरोबर खेळाशी एकरूप
होऊन आदर्श खेळाडू बना

जनार्दन यादव ः मालेत ईगल ॲकॅडमीतर्फे उत्कृष्ट खेळाडूंचा सत्कार

सकाळ वृत्तसेवा
बोरपाडळे, ता. १६ : ‘ग्रामीण भागातील खेळाडूंमध्ये उत्तम खेळ करण्याचे कसब असते. त्यांच्यात शिस्त आणि वक्तशीरपणा
अजूनही रुजायला हवा. मैदानाबरोबर खेळाशी एकरूप होऊन आदर्श खेळाडू व सुदृढ नागरिक बनावे तसेच पालकांनी मुलांना प्रोस्ताहित करावे,’ असे आवाहन कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव व निवड समितीचे सदस्य जनार्दन यादव यांनी केले.
माले (ता. पन्हाळा) येथील ईगल ॲकॅडमीतर्फे मार्गदर्शन व सत्कार समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शासकीय निवासी शाळेचे प्राचार्य संजय भोसले होते. आंतरराष्ट्रीय माजी क्रिकेटपटू राजेश पास्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत ॲकॅडमीच्या खेळाडूंना जिल्हास्तरावर चांगल्या कामगिरीबद्दल सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले तसेच सर्व खेळाडूंना कीटवाटप करण्यात आले. आंतरराष्ट्रीय व्हिलचेअरमधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल क्रिकेटपटू संतोष रांजगणे यांचा विशेष सन्मान झाला. यावेळी प्रकाश पाटील, पतंग चौगुले, महादेव पाटील, प्रल्हाद पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. संजय जमदाडे यांनी सूत्रसंचालन केले. दिलीप जमदाडे यांनी आभार मानले.
.............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrapur Crime : 5 हजार रुपयांचं विष अन् खाकी वर्दीला काळिमा! प्रेमसंबंधाला विरोध केला म्हणून मिल्कशेक पाजून लेकीनंच पोलिस बापाला संपवलं

ललित प्रभाकरने कुशल बद्रिकेची केली हटके हेअरस्टाईल, अभिनेता म्हणाला...'यामुळे आम्ही खास मित्र झालो' Viral Video

Viral Video : पेट्रोल पंपावर बाईक सोडून, पठ्ठ्या फक्त टाकी घेऊन आला; जुगाड पाहून साऱ्यांनी डोक्याला हातच लावला...

रात्रभर पुरेशी झोप घेऊनही सकाळी चेहरा सुजलेला दिसतो? असू शकतं गंभीर 'या' आजाराचं सुरुवातीचं लक्षण, कधीही दुर्लक्ष करू नका

Sindhudurg Rain Update : सिंधुदुर्गला गारपिटीचा तडाखा; कणकवली, वैभववाडीत आंबा-काजू पिकांचे मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT