कोल्हापूर

सैनिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य : भिमसेन चवदार

CD

03108
माले : येथे सैनिक असोसिएशन संघटना कार्यालयाच्या उद्‍घाटनप्रसंगी मान्यवर.

सैनिकांच्या समस्या सोडवण्यासाठी
सर्वतोपरी सहकार्य : भीमसेन चवदार
मालेत सैनिक असोसिएशनचे कार्यालय सुरू
सकाळ वृत्तसेवा
बोरपाडळे, ता. १० : आजी-माजी सैनिकांची संघटना एकदिलाने काम करेल. या संघटनेला सैनिकांच्या समस्या सोडवण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही कोल्हापूर जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल भीमसेन चवदार यांनी दिली.
माले (ता. पन्हाळा) येथील आजी-माजी सैनिक असोसिएशनच्या कार्यालय उद्‍घाटनप्रसंगी ते बोलत होते. यामध्ये मालेतील ६० हून अधिक आजी-माजी सैनिक, वीरमाता, वीरपत्नी यांचा समावेश आहे. आजी-माजी सैनिकांच्या कुटुंबीयांच्या अडचणीचे निराकरण, युवकांना भरतीसाठी प्रोत्साहन, भरतीपूर्व शिक्षणाची व्यवस्था करणे, रोजगार, व्यवसाय, नोकरीबाबत मार्गदर्शन करणे हा संघटनेचा उद्देश असल्याचे संभाजी पाटील यांनी सांगितले.
यावेळी १९७१ च्या युद्धात शहीद झालेले सैनिक भीमराव पाटील यांच्या वीरपत्नी आक्काताई पाटील, शहीद व सेनापदक प्राप्त बाबासाहेब पोवार यांच्या वीरपत्नी सुरेखा पोवार, अमर जवान मनोज सोळसे यांची वीरमाता विमल सोळसे यांचा विशेष सत्कार झाला.
यावेळी जिल्हा सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष विजय पाटील, निवृत्त कर्नल सुभाष पाटील, जिल्हा सैनिक कल्याणचे निवृत्त अधिकारी अशोक पवार, सरपंच उत्तम पाटील, उपसरपंच शोभाताई गुरव, संघटना अध्यक्ष बाजीराव कोडोलकर, भीमराव पाटील, बबन चोपडे, संजय खोत, गुलाब मुल्लाणी, अविनाश हिरवे, विश्‍वास पाटील, आबाजी पाटील, आजी-माजी सैनिक, ग्रामस्थ उपस्थित होते. बसवराज पाटील यांनी सूत्रसंचालन केले. आनंद बादरे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

Pune Ahilyanagar Road: वाघोली गणेश विसर्जन २०२६; पुणे-अहिल्यानगर रोडवरील वाहतूक बदल, पर्यायी मार्ग आणि बाजार बंदची माहिती

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं जाणून घ्या एका क्लिकवर...

Indian Economy: अर्थव्यवस्थेला नवा वेग

SCROLL FOR NEXT