3336
माले ः जोतिर्लिंग पब्लिक स्कूलमध्ये बोलताना सचिन खिल्लारी. शेजारी मान्यवर.
......
नियमित सराव, खिलाडूवृत्तीतून
आयुष्याची घडण ः खिलारी
सकाळ वृत्तसेवा
बोरपाडळे, ता. ३ : ‘सुदृढ आरोग्य ही सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे. ती टिकवण्यासाठी कोणताही खेळ अंगीकारणे, त्यासाठी झोकून देत जीवन यशस्वी करता येते. खेळ आयुष्य घडवते. त्यासाठी नियमित सराव, सातत्य, खिलाडूवृत्ती आणि प्रामाणिकपणा महत्त्वाचा असतो,’ असे प्रतिपादन पॅरा ऑलिंपिक गोळाफेक रौप्यपदक विजेता सचिन खिलारी यांनी केले.
माले (ता. ता. पन्हाळा) येथील जोतिर्लिंग पब्लिक स्कूल व विद्यानिकेतनमध्ये सत्कार समारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी संस्थापक शिवलिंग कळंत्रे यांनी खिलारी यांच्या क्रीडा कार्याचा गौरव केला. यावेळी मुख्याध्यापिका सविता कळंत्रे, उपमुख्याध्यापक सतीश रणभिसे, राष्ट्रीय सॉफ्टबॉल खेळाडू राधिका कळंत्रे, सचिन कोडोलकर, क्रीडाशिक्षक अबिद मोकाशी, कुणाल नाईक, रोहित कळंत्रे, सुनील पाटील, दत्तात्रय पाटील आदी उपस्थिती होते. तुषार माने यांनी सूत्रसंचालन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.