03354
विद्यार्थ्यांचे स्वच्छतेबद्दल
जिल्हाधिकाऱ्यांकडून कौतुक
बोरपाडळे, ता. ४ : आर. आर. खडके ॲकॅडमी संचालित विविध शैक्षणिक संस्थांच्यातरर्फे पन्हाळ्यात महात्मा गांधी जयंती, वन्यजीव सप्ताह आणि जागतिक हेरिटेज दिनानिमित्त स्वच्छता मोहीम राबविली. पुसाटी बुरुज व परिसरात शाळेचे दोनशे विद्यार्थी साफसफाईत मग्न असताना अचानक जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी भेट दिली. विद्यार्थ्यांची चौकशी करत स्वच्छता, विधायक उपक्रमाबाबत कार्याबाबत गप्पा केल्या.
खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी प्रोत्साहित केल्याने विद्यार्थ्यांनी नव्या जोमाने सफाई केल्याची माहिती संस्थापक प्राचार्य अविनाश खडके यांनी सांगितले. विद्यार्थ्यांबरोबर वनपाल सागर पटकारे, वनरक्षक संदीप पाटील,योगेश पाटील, बाजीराव देसाई, प्राचार्या क्रांती खडके, उपप्राचार्या अयोध्या पाटील, रश्मी पोवार आदींनी स्वच्छतेत सहभाग घेतला. यापूर्वी डोंगराला लागलेली आग आटोक्यात आणणे, मुक्या प्राण्यांचे प्राण वाचवणे, वनसंवर्धन, शिवाय अपघातप्रसंगी मदत तसेच धोकादायक खड्डे स्वयंस्फूर्तीने भरण्याच्या उपक्रमात विद्यार्थी सहभागी झाल्याचे प्राचार्या क्रांती खडके यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.