कोल्हापूर

रानोमाळात रंगू लागले शाळांचे परिसरात वनभोजन

CD

03467

रानोमाळात रंगले शाळांचे वनभोजन
पावटयाच्या भाजीचा आस्वाद; पर्यावरणाची ओळखच उद्देश

सकाळ वृत्तसेवा

बोरपाडळे, ता. ६ : प्राथमिकसह अंगणवाड्या आणि माध्यमिक शाळांमध्ये सध्या वनभोजनाचा उपक्रम जोमात सुरू आहे. विशेषतः अनेक प्राथमिक शाळांचा सहभाग मोठ्या उत्साहाने यामध्ये दिसत आहेत. यामध्ये बोरपाडळेसह परिसरातील शहापूर, मिठारवाडी, माले, पोखले, आंबवडे, काखे, मोहरे, आवळी, पैजारवाडी, नावली, शिंदेवाडी, आमतेवाडी आदी शाळांमध्ये वनभोजनाचा उपक्रम राबविला आहे. डोंगराळ किंवा गावापासून दूर भागातील झाडीत, एखाद्या पाणवठ्याजवळच्या ठिकाणाजवळ बेत आयोजित केला आहे. यासाठी आवळीसह मिठारवाडी, आपटी, नावली व आंबवडेतील पावट्याला अधिक पसंदी असून खरेदीसाठी शिक्षक खरेदीसाठी जात आहेत. तब्बल दोनशे रुपये दर असतानाही खरेदी होत आहे. पावटयाच्या आमटी-भाजीचा दरवळ रानावनात घुमत असून विद्यार्थ्यांच्या गाण्यांची-भेंड्यांची याला साथ मिळत आहे. सहभोजनाबरोबरच परिसरातील गोष्टींशी मिळतेजुळते घेणे, निसर्गाशी समरूप होणे, सहभोजनाचा आस्वाद घेणे तसेच माती, झाडे, पक्षी फुले, फळे आदींचे निरीक्षण करण्याचा हाच उद्देश असल्याचे काखेच्या शिक्षिका विजयमाला यादव यांनी सांगितले. या उपक्रमासाठी सरपंच, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष आणि सदस्यांचे सहकार्य लाभत आहे.
----------------------------------
चौकट
मुलांना पर्यावरणात सहभोजनाबरोबर परिसराचे अनुभवातून शिक्षण मिळते. चार भिंतीबाहेर पडल्याने निरिक्षण, सहशिक्षण, निसर्गात स्नेहभोजन आस्वाद आणि प्रत्यक्ष अनुभव मिळतो. यातून मुलांना अध्ययनासाठी प्रोत्साहन मिळेल.
- शरद जाधव, माजी सरपंच बोरपाडळे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uttar Pradesh Ghat Accidents: उत्तर प्रदेशमध्ये गंगा स्नानादरम्यान मोठा अपघात, १२ जण बुडाले; ५ भाविकांचा मृत्यू

Varkari Controversy: वारकरी संप्रदायाचा अवमान प्रकरण: विकास लवांडे यांना जामीन न देण्याची पोलिसांची मागणी, वारीपूर्वी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित

Latest Marathi News Live Update : ट्विशाचा पती आणि आरोपी समर्थ सिंग याला पोलिसांनी त्याच्या निवासस्थानी आणले

Breakfast Drink: व्यस्त लाइफस्टाइलसाठी नवी ब्रेकफास्ट स्मूदी! रेडी-टू-ड्रिंक; हेल्दी आणि टेस्टी ब्रेकफास्टचा फॉर्म्युला

IPL 2027 आधी कोणत्या ४ कर्णधारांची होणार हकालपट्टी? माजी भारतीय क्रिकेट स्पष्ट म्हणाला, 'पहिला हार्दिक पांड्या आणि मग...',

SCROLL FOR NEXT