04161
आंबवडेत ट्रकला अपघात
सकाळ वृत्तसेवा
बोरपाडळे, ता. २३ : कोल्हापूर ते रत्नागिरी मार्गावरील आंबवडे (ता. पन्हाळा) येथे गुरुवारी (ता. २३) सकाळी ८ च्या दरम्यान ट्रकला अपघात झाला. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी; रत्नागिरीहून कोल्हापूरकडे निघालेला सिमेंट वाहतूक करणारा ट्रक (क्रमांक केए २८ एए ५८१०) आंबवडेत आला असता सिमेंटच्या बॅरिकेटला धडकला. यानंतर चालकाचा ताबा सुटून ट्रक विरोधी दिशेला जाऊन जोरात धडकला. यामध्ये ट्रकचे नुकसान झाले; मात्र सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.