कोल्हापूर

न्यूनगंड न बाळगता परिस्थितीला सामोरे जा ः पद्मश्री डॉ. यादव

CD

03286
शेळवाडी (ता. राधानगरी) ः येथील विद्यालयात पद्मश्री डॉ. जी. डी. यादव यांचा सत्कार करताना प्रभारी प्राचार्य ए. डी. पाटील. शेजारी पी. बी. कोले, एम. एस. हिरेमठ आदी.
...............................
न्यूनगंड न बाळगता परिस्थितीला
सामोरे जा ः पद्मश्री डॉ. यादव

सकाळ वृत्तसेवा
शिरगाव, ता. २५ : ‘विद्यार्थ्यांनी आपल्या मातृभाषेचा अभिमान राखला पाहिजे. आपल्यातील न्यूनगंड न बाळगता परिस्थितीला सामोरे जावे. मुलींना समाजात स्थान मिळवून देऊन त्यांचे शिक्षण पूर्ण करू दिले पाहिजे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना समजून घ्यावे. विद्यार्थ्यांनी जिज्ञासू होण्याचा प्रयत्न करून आपली क्षमता ओळखली तरच नवीन पिढी उदयास येईल,’ असे प्रतिपादन पद्मश्री डॉ. जी. डी. यादव यांनी केले.
शेळेवाडी (ता. राधानगरी) येथील विद्यालंकार भवन विद्यालयाचे माजी विद्यार्थी शास्त्रज्ञ, पद्मश्री डॉ. जी. डी. यादव यांनी विद्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी ते बोलत होते. त्यांनी शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला. प्रभारी प्राचार्य ए. डी. पाटील यांनी स्वागत केले. माजी प्राचार्य पी. बी. कोले यांनी शाळेच्या विकासाचा, प्रगतीचा आलेख मांडला. डॉ. यादव यांचा शाळेच्या वतीने, परिसरातील ग्रामपंचायतींच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. यादव यांनी विद्यालयातील आपल्या शालेय आठवणींना उजाळा दिला.
यावेळी डॉ. यादव यांनी विद्यालयात गतवर्षी विविध स्पर्धांत यश मिळविलेल्या प्रत्येक वर्गातील एका विद्यार्थ्याला प्रत्येकी एक हजार रुपये बक्षीस रुपये देऊन सत्कार केला. एम. एस. हिरेमठ यांनी प्रयोगशाळेचा प्रस्ताव ठेवताच डॉ. यादव यांनी अद्ययावत प्रयोगशाळा साहित्य देण्याचे मान्य केले.
यावेळी शेळेवाडी, माजगावचे सरपंच, उपसरपंच, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, गावातील मान्यवर, ग्रामस्थ, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. एन. पी. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. हिरेमठ यांनी आभार मानले.
..................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कच्च्या तेलाच्या दराचा भडका उडणार, १३५ डॉलरवर पोहोचण्याची भीती; महागाई वाढणार?

Crime: दोन पत्नींपासून १८ मुलांचा बाप; तरीही तिसरीच्या नादी लागला; पण 'त्या' गोष्टीवरून बिनसलं; प्रेयसीनं व्यक्तीला भयंकरपणे संपवलं

PM Modi speech Lok Sabha : होर्मुझमध्ये अडथळा कधीच...; लोकसभेत मोदींनी दिला स्पष्ट इशारा

Horoscope : उद्या बनतोय मंगलधन योग; 'या' 4 राशीच्या लोकांना अचानक मिळतील पैसे, भावकीतला त्रास होणार दूर, एक मोठं काम होणार पूर्ण

Dhule Municipal Corporation : धुळे महापालिकेत लोकशाही आली, पण सत्ता अद्याप लांबच! दोन महिने उलटले तरी समित्यांचा पत्ता नाही

SCROLL FOR NEXT