कोल्हापूर

गावोगावी घुमताहेत हरिपाठाचे सूर

CD

3353
पुंगाव ः गावगाड्यातील मंदिरांतून रोज सायंकाळी हरिपाठाचे मंजूळ सूर घुमतात आणि वातावरण चैतन्यमय होऊन जाते. पुंगाव येथील लक्ष्मी नारायण मंदिरात हरिपाठ गाताना भजनी मंडळ. (राजू कुलकर्णी ः सकाळ छायाचित्रसेवा)
..............
गावोगावी घुमताहेत हरिपाठाचे सूर

वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून भक्तिमार्गाला बहर

राजू कुलकर्णी ः सकाळ वृत्तसेवा
शिरगाव, ता. १३ ः ‘देवाचिये द्वारी उभा क्षणभरी । तेणे मुक्ति चारी साधियेल्या । हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा। पुण्याची गणना कोण करी ।। टाळ-मृदंगाच्या गजरात रोज सायंकाळी गावगाड्यातील मंदिरांतून असे हरिपाठाचे अंभग ऐकायला मिळतात आणि सायंकाळच्या शांत वातावरणात भक्तीचा अवघा रंग चढून जातो. दिवसभर काबाडकष्टातून सायंकाळी क्षणभर देवाच्या दारात येऊन शेतकरी हरिपाठात रंगून जातात आणि दिवसभराचा शिणवटा कुठल्या कुठे निघून जातो.
महाराष्ट्र संतांची भूमी आहे. इथे परंपरा, संस्कृती, सणवार यांमधून लोक आपापल्या परिने भक्तिसंप्रदाय वाढवत आहेत. याच संतांच्या भूमीत प्रत्येत गावात वारकरी संप्रदायाची बीजे रुजली आणि वारकरी संप्रदायाचा वटवृक्ष बहराला आला. संत ज्ञानेश्‍वर, तुकाराम, नामदेव, एकनाथ यांची शिकवण उराशी बाळगून कष्टकरी शेतकरी वारकरी संप्रदायात सहभागी झाला आणि लाडक्या विठुरायाची सेवा करू लागला. गावागावांत भजनी मंडळे तयार झाली. विठ्ठलाची माळ गळ्यात घालून त्याच्या दर्शनासाठी कुणी पायी दिंडीने, तर कुणी वाहनाने जाऊ लागले. आषाढी एकादशी असो वा माघ वारी असो, चैत्र वारी असो वा महिन्याची वारी यामधून विठ्ठलाच्या भेटीला जाऊन धन्य होऊ लागले. आपल्या गावातील ग्रामदेवालयात हरिनाम सप्ताहातून कीर्तन, प्रवचनातून आनंद घेतात.
आता तर गावागावांत वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून भक्तिमार्गात वाढच होताना दिसत आहेत. प्रत्येक गावात विठ्ठल-रुक्मिणीचे मंदिर होत आहे. जरी नसले तरी त्या गावातील ग्रामदेवतेच्या मंदिरात भक्तिरसात भाविक न्हाऊन जातात. सकाळी शेतात जाण्यापूर्वी गावातील मंदिरात जाऊन दर्शन घेतात. सायंकाळी घरी येऊन स्वच्छ होऊन पुन्हा टाळ-मृदंगाच्या गजरात हरिपाठ म्हणण्यात तल्लीन होऊन जाता. त्यामुळे दिवसभर केलेल्या कष्टाचा थकवा निघून जातो.
.........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: फ्लॅटमध्ये सुरु होता वेश्याव्यवसाय, बनावट ग्राहकांच्या मदतीने पुणे पोलिसांनी केला पर्दाफाश

Naseeruddin Shah: 'प्रशंसा न करणं म्हणजे देशद्रोह...'! नसीरुद्दीन शाहांचा सरकारवर हल्लाबोल; ‘१९८४’ची आठवण गिरवली, काय म्हणाले?

Latest Marathi News Live Update: जुन्नरमध्ये एका आरोपीवर 'एमपीडीए'अंतर्गत कारवाई

OTT वर आणखी एक कोर्टरूम ड्रामा; ‘अमर विश्वास’चा ट्रेलर प्रसिद्ध; मुख्य भूमिकेत झळकणार हे अभिनेते

TRP मध्ये कमळी, स्वानंदी अन् तारिणीचं वर्चस्व! स्टार प्रवाहच्या टॉप मालिकांना धोबीपछाड; कोण कुठल्या स्थानावर?

SCROLL FOR NEXT