कोल्हापूर

शिवारात पांढर फुलली

CD

05820
कोनवडे ः भुदरगड तालुक्याच्या पश्चिम भागात भात रोप लावणीची सुरू असलेली लगबग.
.......
शिवारात पांढर फुलली

राधानगरी, भुदरगड तालुक्यांत भात रोप लावणीची धांदल

सकाळ वृत्तसेवा
शिरगाव/कोनवडे/धामोड, ता. ४ ः राधानगरी, भुदरगड तालुक्यातील भात रोप लावणीची कामे खोळंबली होती. मात्र, गेले चार दिवस तालुक्यात संततधार पावसाला सुरुवात असल्याने खोळंबलेल्या रोपलावणीला वेग आला आहे. बैलांच्या व रोटावेटर यंत्राच्या सहाय्याने चिखल करून भात रोप लावण्यात शेतकरी गुंतला असून, शिवारात पांढर फुलली आहे.
राधानगरी तालुक्याच्या पश्चिम भागात धामोडसह लाडवाडी, कोते, चांदे, केळोशी, खामकरवाडी, आपटाळ, म्हासुर्ली, कोनोली येथील परिसरासह भुदरगड तालुक्यातील फये, मिणचे, शेणगाव, हेदवडे, देवकेवाडी, पंडिवरे, टिक्केवाडी या पश्चिम भागातील शेतकरी भात रोप लावणीच्या कामात गुंतला आहे. भात लावणीसाठी भाताचे रोप तयार करण्यासाठी अगोदर तरवा टाकला जातो आणि पावसाचा जोर वाढला की, रोप लावणीच्या कामाला सुरुवात होते. मात्र, यंदा हे काम पावसाअभावी खोळंबले होते. रोहिणी नक्षत्रातील पेरण्या साधल्या. मृग नक्षत्राच्या पावसाने त्या तरारूनही आल्या. मात्र, काहीकाळ मृग नक्षत्राने विश्रांती घेतली आणि मृग संपून आर्द्रा नक्षत्र सुरू झाले. सुरुवातीला याही नक्षत्राने शेतकऱ्यांना प्रतीक्षा करायला लावली. त्यामुळे भात रोप लावणीची कामे खोळंबली.
परिणामी काही ठिकाणी नदी, विहिरीच्या पाण्यावर रोप लावणीच्या कामाला सुरुवात झाली. मात्र, डोंगर माथ्यावर आणि ज्या ठिकाणी पाण्याची सोय नाही, अशा ठिकाणची रोपलावणीची कामे खोळंबून राहिली. मात्र, शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले असतानाच गेले आठवडाभव पावसाने कृपा केली आणि संततधार सुरू केली. पाऊस सुरू झाल्याने शिवारात रोपलावणीसाठी एकच धांदल उडाली. तरवा काढणे, चिखल करणे, रोप लावणे आदी कामांसाठी शिवार पुलून गेल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
....
चौकट...
मजूर टंचाईवर फुट्टा पद्धत
ग्रामीण भागात सध्या शेतमजुरांची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे शेतकरी गट शेती अथवा फुट्टा पद्धतीने एकमेकांना भात लावणीसाठी मदत करतात. ग्रामीण भागात आजही फुट्टा पद्धतीचा वापर केला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune-Kolad Road Accident : पुणे-कोलाड मार्गावर लवळे फाट्याजवळ भीषण अपघात; सिमेंटच्या ट्रकने कार-दुचाकींना उडवले, एकजण जागीच ठार, दोघे गंभीर

प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवा ट्विस्ट! गोळी आरोपीलाही लागल्याची शक्यता, एसआयटीकडून पुरावे संकलित

मुंबईत आंदोलन करणं CJPला महागात पडलं! अभिजीत दिपकेंसह सर्व आंदोलकांवर गुन्हा दाखल, पोलिसांची कडक कारवाई

Latest Marathi News Live Update : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी जंतर-मंतरवर १० ऑक्टोबरला CJPचे आंदोलन

Sarva Pitri Amavasya 2026: यंदा सर्वपित्री अमावस्या कधी आहे? जाणून घ्या शुभ तिथी, तर्पण मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व

SCROLL FOR NEXT