कोल्हापूर

विद्यार्थी, शिक्षकांनी लुटला चिखल महोत्सवाचा आनंद

CD

3571
कसबा तारळे ः येथील शिवाजी हायस्कूलमध्ये चिखल महोत्सवात दंग झालेले विद्यार्थी.
.........
विद्यार्थी, शिक्षकांनी लुटला
चिखल महोत्सवाचा आनंद

कसबा तारळेच्या शिवाजी हायस्कूलमध्ये आयोजन

सकाळ वृत्तसेवा
कसबा तारळे, ता. ७ ः पावसाची संततधार, शाळेच्या प्रांगणात झालेला चिखल आणि या लालेलाल चिखलातील मनसोक्त खेळ... असा आगळावेगळा चिखल महोत्सव येथील श्री शिवाजी हायस्कूलने घेतला. पावसात चिंब भिजून लाल चिखलात रंगून विद्यार्थ्यांनी या महोत्सवाचा आनंद द्विगुणित केला. आपल्या मातीशी नातं जोडणारा, मातीच्या मायेची ऊब देणारा असा हा चिखल महोत्सव होता.
राधानगरी तालुक्यात सध्या पावसाची संततधार सुरू आहे. वरून पडणारा पाऊस, शाळेभोवती साठलेले पाणीच पाणी आणि चिखल यातून खेळाची वेगळीच अनुभूती विद्यार्थ्यांना मिळाली. क्रीडा शिक्षक एस. डी. कांबळे यांच्या संकल्पनेतून हा चिखल महोत्सव घेतला. मातीमधून कोणताही संसर्ग होऊ नये म्हणून अंगावर तसेच मातीमध्ये हळद पसरण्यात आली. गोमूत्र शिंपडण्यात आले आणि मग सुरू झाला एकच जल्लोष. मातीत खेळण्याचा, लोळण्याचा, मातीचे लेपन करून विद्यार्थी-विद्यार्थिनींनी मनसोक्त खेळण्याचा आनंद लुटला. विद्यार्थ्यांनी संगीताच्या तालावर चिखलात नृत्य केले, रस्सीखेच, फुटबॉल यांसारखे खेळ खेळले. महोत्सवात विद्यार्थ्यांसोबत सर्व शिक्षकांनीही आनंद लुटला. महोत्सवाचे उद्‍घाटन प्राचार्य डी. एस. कांबळे, पर्यवेक्षक बी. पी. शितोळे यांच्या हस्ते करण्यात आले
................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fifa World Cup 2026 : तोंडावर हात ठेवून बोलला, रेफरीने करेक्ट 'कार्यक्रम' केला; Miguel Almiron सोबत विचित्र घडलं... Video Viral

Telegram Ban नंतर ॲक्सेससाठी लोकांनी शोधल्या नव्या पद्धती; रॉकेटच्या वेगाने वाढले VPN डाऊनलोड, कसं वापरायचं पाहा?

Latest Marathi Live Updates: SIR कडे दुर्लक्ष करू नका- राज ठाकरे

FDA Action: तुकाराम मुंढे अ‍ॅक्शन मोडवर, राज्यभरात धडाका; बालरोगतज्ज्ञाच्या रुग्णालयावर एफडीएची कारवाई, औषधसाठा जप्त

Amit Shah Fitness Routine : गृहमंत्री शहा एक दिवस कोल्हापुरात पण फिटनेससाठी विशेष तयारी, दिल्लीतून आले आचारी; व्यायामशाळेतून ट्रेडमिल, डंबेल्सही मागवले

SCROLL FOR NEXT