महिला, बालके कायद्याबाबत
पाटील विद्यालयात कार्यशाळा
शिरगाव, ता. ११ : महिला व बाल विकास कार्यालय राधानगरी यांच्या वतीने आवळी खुर्द (ता. राधानगरी) येथील भाऊराव पाटील विद्यालयात महिला व बालके कायदा व संरक्षण याविषयी कार्यशाळा झाली. कार्यशाळेत तालुका संरक्षण अधिकारी एन. ए. गुरव व आर. जी. कांबळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
पोक्सो कायदा, महिला संरक्षण व महिलांचे अधिकार व कर्तव्य तसेच लहान वयात बालकाने कोणता गुन्हा केल्यास कोणती शिक्षा होते याबाबत माहिती दिली. आर. जी. कांबळे यांनी बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायदा २०१२ बाबत माहिती देताना बालकांच्या निकोप शारीरिक, मानसिक बौद्धिक विकास होण्यासाठी कायदा केल्याचे सांगितले. बालक म्हणजे कोण, या कायद्यांतर्गत गुन्हा कशाप्रकारे असतो व त्या गुन्ह्याबाबत असणाऱ्या शिक्षेची तरतूद याबाबत माहिती दिली. मुख्याध्यापक डी. आय. पाटील, बी. डी. कानकेकर, एस. व्ही. मोहिते, एस. ए. बुगडे, ए. के. फडणीस, एस. एम. पाटील, डी. एन. हालके,
डी. बी. शिंदे, सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.