4424
शिरगाव : येथे मंगळवारी वादळी पावसाने झालेले नुकसान. (राजू कुलकर्णी ः सकाळ छायाचित्रसेवा)
..........
वादळी पावसाने झालेल्या
नुकसानीचे पंचनामे पूर्ण
शिरगाव, मुसळवाडी, कांबळवाडीत घरांचे नुकसान
सकाळ वृत्तसेवा
शिरगाव, ता. ४ : मंगळवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने मोठा तडाखा दिल्याने शिरगावसह मुसळवाडी, कांबळवाडी आदी गावांतील नागरिकांच्या घराचे पत्रे, कौले उडून प्रचंड नुकसान झाले. नुकतेच नुकसानीच्या पंचनाम्याचे काम पूर्ण झाले असून, शिरगाव येथे सर्वाधिक ९४ नागरिकांच्या घरांना वादळी पावसाचा फटका बसला आहे.
मंगळवारी वादळी वारे व पावसाने परिसरातील लोकांच्या मनात धडकीच बसवली. अनेकांच्या घरावरील कौले, पत्रे उडून गेले. शिवारात पाणीच पाणी झाले. विद्युत वाहिन्या तुटल्याने परिसरातील वीजपुरवठा दोन दिवस खंडित झाला. शिवारातील मोठमोठे वृक्ष उन्मळून पडल्याने पिकांचे नुकसान झाले. पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नागरिकांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार महसूल विभाग ग्रामपंचायत प्रशासनाने नुकतेच पंचनामे पूर्ण केले. पंचनाम्याच्या मिळालेल्या माहितीनुसार शिरगाव ९४, मुसळवाडी २०, कांबळवाडीतील ७ नागरिकांच्या घरांचे नुकसान झाले आहे. तलाठी नीलेश पाटील, ग्रामविकास अधिकारी अशोक भांदिगरे, कोतवाल सर्जेराव व्हरकट, सरपंच संदीप पाटील, उपसरपंच अंकुश गुरव, धान्य विभागाचे बाबूराव पाटील, मुसळवाडी, कांबळवाडी येथील सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीत पंचनामे करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.