4545
शिरगाव : येथील आरोग्य उपकेंद्राच्या खोल्यांमध्ये साचलेले पाणी व इमारतीवरील उडालेले पत्रे.
........
शिरगाव आरोग्य उपकेंद्रावरील
पत्रे फुटल्याने स्लॅबला गळती
आरोग्य सेवेवर परिणाम ः दुरुस्तीची मागणी
सकाळ वृत्तसेवा
शिरगाव, ता. २७ : दोन महिन्यांपूर्वी वादळी पावसाने येथील आरोग्यवर्धिनी उपकेंद्राच्या इमारतीचे छताचे पत्रे उडून गेले होते. मात्र, ते अद्याप बसविलेले नाहीत. पत्रे उडाल्याने इमारतीच्या स्लॅबला पावसामुळे गळीत लागली असून रुग्णसेवेत अडचणी येत आहेत. इमारतीच्या दुरुस्तीचे काम त्वरित करावे, अशी नागरिकांतून होत आहे.
शिरगाव येथे काही वर्षांपूर्वी आरोग्य उपक्रेंद्राची दुमजली इमारत बांधली आहे. येथे परिसरातील रुग्णांवर उपचार केले जातात. एक एप्रिल रोजी परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या वळीव पावसात इमारतीच्या निम्म्या भागावरील पत्रे उडून गेले होते. या घटनेला दोन महिन्यांचा काळ लोटला तरी अद्याप छताच्या दुरुस्तीचे काम केलेले नाही. पहिल्या मजल्यावर स्लॅब असल्याने उन्हाळ्यात याचा फारसा त्रास झाला नाही. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या सभागृहावरील पत्रे उडाल्यामुळे स्लॅबवर पाणी साचल्याने गळीत लागली आहे. त्यामुळे उपकेंद्राच्या खोल्यांमध्ये पाणी साचत असल्याने त्याचा रुग्णसेवेवर परिणाम होत आहे. त्यामुळे इमारतीच्या दुरुस्तीचे काम करावे, अशी मागणी होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.