कोल्हापूर

शिनोळी येथे शिवसेनेचा रास्ता रोको

CD

02798
शिनोळी ः काजू बोर्डाचे कार्यालय शिनोळी येथे व्हावे या मागणीसाठी शिवसैनिकांनी बेळगाव- वेंगुर्ला मार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. पोलिस निरीक्षक संतोष घोळवे यांना निवेदन दिले.
-----------------------------------------------------------------------------------
शिनोळी येथे शिवसेनेचा रास्ता रोको
बेळगाव- वेंगुर्ला मार्ग रोखला; काजू बोर्डाचे मुख्य कार्यालय चंदगडला करण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. २९ ः शासनाच्या काजू महामंडळाचे मुख्य कार्यालय चंदगड येथे करावे या मागणीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे बेळगाव-वेंगुर्ला मार्गावर शिनोळी (ता. चंदगड) येथे रास्ता रोको केला. यामुळे काही काळ वाहतूकीची कोंडी झाली.
शासनाने काजू महामंडळाची स्थापना करताना सर्वाधिक उत्पादन आणि प्रक्रिया उद्योग असलेल्या चंदगड, आजरा तालुक्यांवर अन्याय केल्याची भावना आहे. महामंडळाचे मुख्य कार्यालय वाशी (मुंबई) येथे तर उर्वरीत दोन विभागीय कार्यालये सिंधुदूर्ग व रत्नागिरी येथे केली आहेत. घाटमाथ्यावरील चंदगड, आजरा, कर्नाटक सीमाभागातील बेळगाव, खानापूर, कारवार परिसरात मोठ्या प्रमाणात काजू उत्पादन असताना या विभागाला न्याय दिला नसल्याची भावना शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी व्यक्त केली. पालकमंत्री दीपक केसरकर चंदगड, आजरा तालुक्यावर अन्याय करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. काजू महामंडळाची स्थापना केली म्हणून फलकबाजी करणारे स्थानिक नेते महामंडळाचे कार्यालय येथे यावे म्हणून प्रयत्न करीत नाहीत याबद्दल खंत व्यक्त केली. महामंडळाचे कार्यालय चंदगड येथे न केल्यास भविष्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा उपजिल्हा प्रमुख प्रभाकर खांडेकर यांनी दिला. जिल्हा महिला संघटक शांता जाधव यांच्यासह शिवसैनिक, महिला कार्यकर्त्यांनीही सहभाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

SCROLL FOR NEXT