कोल्हापूर

काजू गोदामाला आग

CD

02809
आमरोळी:  येथील काजू गोदामाला लागलेल्या आगीत झालेले नुकसान.
-----

आमरोळीत वीज कोसळून
काजू कारखान्याला आग

९० लाखांचे नुकसानः काजू बियांची पोती आगीच्या भक्ष्यस्थानी

चंदगड, ता. २९ : आमरोळी (ता. चंदगड) येथील श्रीराम शेती माल सहकारी प्रक्रिया संस्थेच्या काजू कारखान्याला आग लागली. यात सुमारे ९० लाखांचे नुकसान झाले. गडहिंग्लज येथील अग्निशामक दलाच्या जवानांनी आणि ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.
रविवारी (ता. २८ ) सायंकाळी पाचच्या सुमारास विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. याचवेळी कारखान्याच्या गोदामावर वीज कोसळली. काजूच्या पोत्यांनी पेट घेतला. हळूहळू आगीने रौद्ररूप धारण केले. यामध्ये सुमारे ८०० ते ९०० काजू बीची पोती, छतावरील सिमेंटचे पत्रे, लाकडी खांब आदी साहित्य जळून खाक झाले. आग लागल्याचे लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, गडहिंग्लजहून अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणण्यात आली. तलाठी रुपाली कांबळे, पोलिस पाटील मारुती नाईक,धोंडीबा नाईक,  विजयकुमार कांबळे, उत्तम वाईगडे, सुरेश वाइंगडे, प्रकाश वाइंगडे यांनी पंचनामा केला. कारखान्याचे अध्यक्ष पांडुरंग मंडलिक यांनी घटनेची वर्दी पोलिसात दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पक्षात खदखद! नेतृत्वावर थेट प्रश्न अन्...; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची भावनिक पोस्ट चर्चेत, काय म्हणाले?

जमीन, जागेची खरेदी-विक्री आता कोणत्याही तालुक्यात! खरेदी-विक्री व्यवहारातून राज्याच्या तिजोरीत ५८,६७३ कोटी; ३१ मार्चपर्यंत सुट्टीतही सुरु राहणार कार्यालये

सोने-चांदीच्या भावात अचानक वाढ! युद्धानंतर सुरू असलेल्या घसरणीला ब्रेक, सोनं ५५००ने तर चांदी ११००० रुपयांनी महाग

Karad News : कऱ्हाड - चिपळुण मार्गावरील अवजड वाहतुक बंद; महामार्गाच्या कामासाठी दोन महिने वाहतुकीत बदल

खरातचं कुटुंब परदेशात पलायनाच्या तयारीत? पतीचे कोट्यवधींचे व्यवहार माहिती नाहीत, पत्नीची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT