कोल्हापूर

हलकर्णी महाविद्यालयाचे युवा महोत्सवमध्ये यश

CD

03667
हलकर्णी ः मध्यवर्ती युवा महोत्सवामध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करताना गोपाळराव पाटील व अशोक जाधव. शेजारी इतर मान्यवर.
--------------------
हलकर्णी महाविद्यालयाचे युवा महोत्सवमध्ये यश
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. ३ ः हलकर्णी (ता. चंदगड) येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दहिवडी (सातारा) येथे झालेल्या मध्यवर्ती युवा महोत्सवामध्ये यश संपादन केले. पथनाट्यामध्ये द्वितीय तर रांगोळीमध्ये तृतीय क्रमांक पटकावला. शिवाजी विद्यापीठ अंतर्गत हा महोत्सव झाला. कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील स्पर्धक सहभागी झाले होते. पथनाट्यामध्ये हर्षद कांबळे, साहिल कांबळे, करुणा तानगावडे, अनुराधा पाटील, निलम पाटील, ऐश्वर्या पाटील, निकीता खोत, प्राजक्ता सुतार, ज्योती पेडणेकर, राधिका बसरीकट्टी यांनी उत्कृष्ट सादरीकरण केले. संजयकुमार सुतार याने रेखाटलेली रांगोळी उपस्थितांसाठी आकर्षण ठरली. संस्थेचे ज्येष्ठ संचालक गोपाळराव पाटील व अध्यक्ष अशोक जाधव यांच्या हस्ते या कलाकारांचा सत्कार केला. संस्थेचे उपाध्यक्ष संजय पाटील, सचिव विशाल पाटील, प्राचार्या डॉ. बी. डी. अजळकर आदी उपस्थित होते. प्रा. पी. ए. बोभाटे यांनी प्रास्ताविक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Marathi News Live Updates : मध्य प्रदेशातील सांवर येथे भिंत कोसळून चार महिलांचा मृत्यू, पाच जण जखमी

Otur News : जुन्नर तालुक्यात प्रस्तावित कल्याण–लातूर जनकल्याण महामार्गाला तीव्र विरोध; शेतकरी आक्रमक, धरणे आंदोलनाला सुरुवात

SCROLL FOR NEXT