03892
हलकर्णी : प्रा. विजय घोडके यांचे स्वागत करताना प्राचार्य डॉ. अजळकर.
-----------------------
बौद्धिक संपदेचे अधिकार समजून घेणे गरजेचे
प्रा. विजय घोडके : हलकर्णी महाविद्यालयात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. ३ : वेगवेगळ्या उद्योग व्यवसायातील खुणा, काही गोष्टींची ठराविक निशाणी आणि त्याचे अधिकार यांचा समावेश बौद्धिक संपदेत होतो त्याची माहिती असणे गरजेचे आहे, असे मत प्रा. विजय घोडके यांनी व्यक्त केले.
हलकर्णी (ता. चंदगड) येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात आयपीआर व आयक्यूएसी उपक्रम अंतर्गत ‘बौद्धिक संपदा’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. बी. डी. अजळकर होते. प्रा. घोडके म्हणाले, ‘आपल्या मालमत्तेचे अधिकार समजून घेताना मालमत्ता, त्याचे वेगवेगळे संदर्भ, ट्रेडमार्क, पेटंट, कॉपीराईट हक्क याची माहिती करून घेतल्यास उद्योग व्यवसाय करणे सोपे जाते शिवाय सुरक्षितता प्राप्त होते.’ प्राचार्य डॉ. अजळकर म्हणाले, ‘डिजिटल युगामध्ये नवनवीन नियम, कायदे व आपले हक्क याविषयी विद्यार्थ्यांनी ज्ञान मिळवावे.’ डॉ. चंद्रकांत पोतदार यांनी प्रास्ताविक केले. प्रा. पी. ए. पाटील यांनी स्वागत केले. डॉ. एस. आर. वायकर यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.