कोल्हापूर

वन हद्दीतील अतिक्रमणे हटवली

CD

chd221.jpg

04308

पार्ले वन हद्दीतील अतिक्रमण हटवले
पाटणे वन विभागाची कारवाई ; २२ कुटुंबीयांकडून १५ हेक्टरवर अतिक्रमण

सकाळ वृत्तसेवा

चंदगड, ता. २२ : पाटणे ( ता. चंदगड) वनहद्दी अंतर्गत पार्ले (ता. चंदगड) येथील ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले होते. उपवनसंरक्षक जी. गुरुप्रसाद, सहाय्यक वनसंरक्षक नवनाथ कांबळे यांच्या आदेशाने वनक्षेत्रपाल प्रशांत आवळे यांच्या उपस्थितीत कर्मचाऱ्यांनी अतिक्रमण आज काढून टाकले. सुमारे १५ हेक्टरवर हे अतिक्रमण होते.
गावाला लागूनच वन हद्द असून अनेक वर्षांपासून ग्रामस्थांनी वन हद्दीत अतिक्रमण करून जनावरांसाठी गोठा, जनावरे बांधली होती. काहीजण कच्ची घरे बांधून यात वास्तव्य करत आहेत. या संदर्भात तक्रारी झाल्यानंतर वन विभागाने आज कारवाईचा बडगा उगारला. यासंदर्भात संबंधित अतिक्रमणधारकांना आधीच सूचना दिली होती. त्यानुसार अनेकांनी साहित्य काढून घेतले. वन कर्मचाऱ्यांनी झोपड्या व इतर बांधकाम उद्ध्वस्त केले. जी कुटुंबे वास्तव्याला आहेत त्यांच्यावर वरिष्ठांच्या आदेशानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. वनपाल जॉन्सन डिसोजा, बी. आर. भांडकोळी, सुनील नागवेकर, वनरक्षक पांडुरंग कुलाळ, खंडू कोरे, प्रकाश शिंदे, मेघराज हुल्ले, सचिन अडसूळ, रुद्रगोंडा पाटील, श्रेयस रायके, अलका लोखंडे, सागर पाटील, वनसेवक तुकाराम गुरव, पुंडलिक नागुर्डेकर, चंद्रकांत बांदेकर, मोहन तुपारे, विश्वनाथ नार्वेकर, शुभम बांदेकर यांनी कारवाईत सहभाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fifa World Cup 2026 : यंदाचा वर्ल्ड कप ब्राझीलचाच! Vinícius Jr. मुळे जुळून आलाय भन्नाट योगायोग; इरतांना धडकी भरवणारी बातमी

Maharashtra Electricity: येत्या दोन वर्षांत गुजरातपेक्षाही स्वस्त वीज: मुख्यमंत्री फडणवीस, २०२९-३० पर्यंत महाराष्ट्र अव्वल ठरणार

Latest Marathi News Live Update : "ग्लोबल साउथ"ला अधिक क्षमता आणि अधिक संधींनी सक्षम केले पाहिजे.

Malshiras Well Accident : हायवे पूर्ण झाल्याचा खोटा दाखला अन् 8 जणांचा विहिरीत बुडून मृत्यू! तांदुळवाडी दुर्घटनेनंतर धक्कादायक माहिती समोर, कंत्राटदार अजूनही मोकाट

FIH Hockey Nations Cup: भारतीय महिला ठरल्या चॅम्पियन! यजमान न्यूझीलंडचा उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT