मळवीत उसाच्या
ट्रकखाली सापडून
शेतकऱ्याचा मृत्यू
चंदगड, ता. ७ : तुडिये-कोलीक मार्गावर मळवी (ता. चंदगड) येथे उसाचा ट्रक दुचाकीवर उलटून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार शेतकरी ट्रकखाली सापडून जागीच ठार झाला. मंगेश रामू पाटील (वय ५८, रा. मळवी) असे त्याचे नाव आहे. आज सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली.
तुडिये-कोलीक रस्त्यावरून उसाने भरलेला ट्रक खालसा म्हाळुंगे (ता. चंदगड) येथील इको-केन शुगर्स कारखान्याकडे जात होता. शेतात रताळी काढणीचे काम करून मंगेश दुचाकीवरून घरी जात होते. मळवी फाट्यावर समोरून येणारा उसाचा ट्रक अचानक उलटला. त्यामध्ये मंगेश दुचाकीसह अडकले. भरलेला ऊस अंगावर पडल्याने गुदमरून त्यांचा जागीच मृत्यू झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.