कोल्हापूर

नरसिंगराव पाटील जयंती

CD

chd34.jpg

05302

माजी आमदार नरसिंगराव पाटील
यांना जयंतीनिमित्त अभिवादन

चंदगड, ता. ३ : ‘‘माजी आमदार दिवंगत नरसिंगराव गुरुनाथ पाटील सुसंस्कृत आणि तत्त्वनिष्ठ राजकारणी व्यक्तिमत्त्व होते,’’ अशी भावना मान्यवरांनी व्यक्त केली. त्यांच्या ९२ व्या जयंतीनिमित्त म्हाळेवाडी (ता. चंदगड) येथे अभिवादन कार्यक्रम झाला.
दौलत सहकारी साखर कारखान्याचे माजी सचिव एस. एल. पाटील म्हणाले, ‘‘नरसिंगराव पाटील यांनी रोखठोक भूमिकेमुळे अनेकदा कार्यकर्त्यांना नाराज केले. तरीही त्यांनी हजारो कार्यकर्त्यांना रोजगाराची संधी दिली. प्रशासनावर त्यांची भक्कम पकड होती. त्यांच्यासारखी सुसंस्कृत, प्रामाणिक माणसे राजकारणात दुर्मिळ झाली असून, त्यांची उणीव कायम भासते.’’ प्रारंभी गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील दूध संस्थेच्या सभागृहात नरसिंगराव पाटील यांच्या पुतळ्याचे माजी आमदार राजेश पाटील, निखिल पाटील, तानाजी गडकरी, मानसी भोगण, सुरेश पाटील, नागोजी पाटील, विनोद पाटील, सूर्यकांत पाटील, सरपंच सी. ए. पाटील व उपसरपंच विजय मरणहोळकर यांच्या हस्ते पूजन झाले. रुकमाना पाटील, हणमंत कांबळे, डी. के. पाटील, वसंत पाटील, भरमू पाटील, अभिजीत कांबळे, प्रशांत कांबळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. घुल्लेवाडी, मलतवाडी, म्हाळेवाडी व निट्टूरमधील श्री पंत भक्त मंडळाच्या सदस्यांनी आरती सादर केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs NZ: जो रुट सचिन तेंडुलकरच्या विश्वविक्रमाच्या आणखी जवळ पोहचला! कसोटीत 'असा' पराक्रम करणारा जगातील दुसराच ठरला

T20 World Cup 2026: ऑस्ट्रेलियाच्या मोठ्या विजयानं टीम इंडियाला मोठा धक्का! सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी चूरस वाढली

FDC drugs ban: मोठा निर्णय! केंद्राकडून १६ प्रकारच्या‘एफडीसी’ औषधांवर बंदी; 'या' मेडिसिन्सचा समावेश

Aditya Thackeray: ''गेलेल्यांना माघारी यायचं असेल तर...'' उद्धव ठाकरेंचा निरोप देत, आदित्यंचं मोठं विधान, काय म्हणाले?

Rohit Sharma चं टेन्शन वाढणार... कर्णधार शुभमन गिलने अफगणिस्तानविरुद्धच्या विजयानंतर दिलाय इशारा

SCROLL FOR NEXT