कोल्हापूर

लाभार्थ्यांनी तातडीने बांधकाम सुरू करावे

CD

लाभार्थ्यांनी तातडीने बांधकाम सुरू करावे

नगराध्यक्ष काणेकर ः चंदगडमध्ये प्रधानमंत्री आवास घरकुल कार्यशाळा

सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. १० : ‘घरकुल मंजूर झालेल्या लाभार्थ्यांनी तातडीने बांधकाम पूर्ण करावे,’ अशी सूचना नगराध्यक्ष सुनील काणेकर यांनी केली. प्रधानमंत्री आवास घरकुल योजना (शहरी) २.० अंतर्गत येथे नगरपंचायतीच्या वतीने कार्यशाळा झाली. यावेळी ते बोलत होते. यावेळी शहरातील ५२ इच्छुक लाभार्थी उपस्थित होते.
नगराध्यक्ष काणेकर यांनी शहरातील अनेक भागांमध्ये सात-बारा नोंद नसलेल्या, मात्र ग्रामपंचायत काळात १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर खरेदी केलेल्या जागांबाबत शासनाकडून मार्गदर्शन मागविणार असल्याचे सांगितले. अशा जागांवर नगरपंचायतीची असेसमेंट नोंद असल्यास गरजू लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळावा, यासाठी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी नमूद केले. उत्पन्न दाखला, रेशनकार्ड, सात-बारा मालकीपत्र आदी आवश्यक कागदपत्रे वेळेत उपलब्ध व्हावीत व अर्ज प्रक्रिया सुलभ व्हावी, यासाठी संबंधित कार्यालयांशी समन्वय साधला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
जिल्हा समन्वयक अधिकारी अशोक कोरे यांनी लाभार्थ्यांना योजनेविषयी मार्गदर्शन केले. शहरातील घरकुल बांधकामासंदर्भातील अडचणींवर चर्चा झाली. विशेषतः गावठाणाबाहेरील लाभार्थ्यांकडे सातबारा मालकी असलेल्या जागांबाबतचा मुद्दा चर्चेत आला. रहिवासी क्षेत्र असलेल्या ठिकाणी नागरिकांना घरकुलाचा लाभ देण्याबाबत शासनस्तरावर विचार सुरू असल्याची माहिती कोरे यांनी दिली. लाभार्थी पात्रतेसाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती दिली. तांत्रिक समन्वयक अभियंता अमित जाधव यांनी मंजूर व शासनाकडे मंजुरीसाठी पाठविलेल्या प्रस्तावांची माहिती दिली. अनेक अर्जदारांनी शेती विभागात समाविष्ट असलेल्या जागांमध्ये घरकुलासाठी अर्ज केल्याने त्यांचे अर्ज अवैध ठरल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
शहरात पहिल्या टप्प्यात १२ लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झाले असून, त्यापैकी नऊ जणांची बांधकामे पूर्णत्वाकडे गेली आहेत. तसेच २७ लाभार्थ्यांचे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविल्याची माहिती देण्यात आली. उपनगराध्यक्ष आयेशा नाईकवाडी, बांधकाम सभापती अजिंक्य पिळणकर, नगरसेवक अबूजर मदार, सिकंदर नाईक, प्रमोद कांबळे, एकता दड्डीकर, सचिन सातवणेकर, अमेय सबनीस, प्रशासकीय अधिकारी स्वप्निल कदम, नगर लेखापाल आतिश काटकर, सामाजिक कार्यकर्ते अनिल कदीरहद यांच्यासह नागरिक उपस्थित होते. बांधकाम लिपिक संतोष कडूकर यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff : मुंबई इंडियन्स स्पर्धेबाहेर! शेवटच्या षटकात थरार अन् RCBचा रोमहर्षक विजय; POINT TABLE मध्ये अव्वल स्थानी झेप

PM मोदींमुळे भारतात तेल-गॅस मिळतोय, आवश्यकतेनुसार वापराचं आवाहन योग्यच; मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

RCB vs MI Live: तिलक वर्माची विकेट अन् रोहित शर्मा संतापला; मुंबई इंडियन्स कसेबसे सन्मानजनक धावांपर्यंत पोहोचले Video Viral

Pune Crime: पुण्यात मोठी कारवाई; ‘एमडी’ ड्रग्ज कारखाना उघडण्याचा कट उधळला, सव्वा कोटींच्या मुद्देमालासह आठ जणांना अटक!

संकटाचा काळ! वर्षभर परदेशगमन, सोनं खरेदी करू नका; खाद्यतेलही कमी खा, मोदींनी असं आवाहन का केलं?

SCROLL FOR NEXT