कोल्हापूर

अधिकारी, कर्मचाऱ्यांना सभापतींच्या कानपीचक्या

CD

अधिकारी, कर्मचाऱ्यांना सभापतींच्या कानपिचक्या
चंदगड पंचायत समिती सभा; गाव पातळीवर जाऊन काम करण्याची सूचना
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. २७ :  जिल्हा परिषदेकडे काम करणारे विविध खात्याचे अधिकारी व कर्मचारी केवळ कागदी घोडे नाचविण्याचे काम करतात. स्थानिक पातळीपर्यंत जाऊन शासनाच्या योजना प्रभावीपणे राबविण्यात ते कमी पडतात. लोकाभिमुख योजना राबविण्याचा शासनाचा हेतू आणि कोट्यवधी रुपयांचा निधी सार्थकी लावायचा असेल तर गाव पातळीपर्यंत जाऊन काम करा. त्याचा पाठपुरावा करा, अशा कानपिचक्या सभापती विलास नाईक यांनी दिल्या. पंचायत समितीच्या मासिक सभेत ते अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.
विविध खात्यांचा आढावा घेत असताना जबाबदार अधिकारी स्वतः उपस्थित न राहता कनिष्ठ कर्मचाऱ्याला बैठकीसाठी पाठवतात हे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांच्याकडून योग्य माहिती उपलब्ध होत नाही. परिणामी, बैठकीचा हेतूच निष्कळ होत असल्याबद्दल त्यांनी कडक शब्दांत हजेरी घेतली. केवळ मासिक बैठकीपुरते येऊन आकडेवारी वाचून दाखविण्याऐवजी महिनाभर प्रत्यक्ष काम करा, अशी सूचना त्यांनी केली.
पंचायत समितीच्या बांधकाम विभागाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करण्यात आली. काही गावांतून गटारींतून पाण्याची पाईपलाईन गेली आहे. त्या ठिकाणी ग्रामसेवकाच्या सहकार्याने नियोजन राबविणे गरजेचे आहे. त्याकडे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे दुर्लक्ष असल्याचा आरोप झाला. आरोग्य विभागाकडून ‘माझे गाव, आरोग्य संपन्न गाव’ योजना राबविण्याबाबत उदासीनता आहे. या विभागाची योजना लोकांपर्यंत जात नाही याकडे लक्ष वेधले. तालुक्यात जीबी सिंड्रोमचे प्रमाण वाढत असून, आरोग्य विभागाने दक्ष राहावे, अशी सूचना केली. तालुक्यातील रस्त्यांच्या दुतर्फा वठलेली झाडे तोडण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून निष्काळजीपणा असल्याचे सभापती नाईक यांनी सांगितले. यावर या संदर्भात लिलावाला प्रतिसाद मिळाला नसल्याचे या विभागाकडून सांगण्यात आले. या झाडांचे मूल्यांकन अत्यंत कमी किमतीत केले जात असल्याने ठेकेदाराला ती तोडून घेणे सुद्धा परवडत नसल्याकडे सदस्य पांडुरंग बेनके यांनी लक्ष वेधले. योग्य मूल्यांकन करून फेरलिलाव काढा; अन्यथा बांधकाम विभाग व वन विभागावर कारवाई करावी लागेल, असा इशारा देण्यात आला. ढोलगरवाडी येथे आयोजित रानभाजी प्रदर्शनातून अनेक दुर्मीळ रानभाज्या पहायला मिळाल्या. त्यांचे नर्सरीमध्ये संगोपन करता येईल का, या दृष्टीने पंचायत समिती व महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने प्रयत्न करावेत, अशी सूचना करण्यात आली. तालुक्यातील जनावरांसाठी लाळ खुरकतच्या ४५ हजार ६०० लस मात्रा उपलब्ध झाल्याचे सांगण्यात आले. सदस्य प्रेमा हुलजी यांनीही चर्चेत सहभाग घेतला. सहायक गटविकास अधिकारी अरुणा सूर्यवंशी यांनी आभार मानले.
-------------
दृष्टिक्षेपात
- हत्ती, गवे या पाठोपाठ आता रानडुकरांचा उपद्रव वाढला आहे. त्याच्या शिकारीसाठी शासनाने परवानगी देण्याची मागणी मधुकर आंबेवाडकर यांनी केली
- ग्रामीण पाणीपुरवठा विभागसुद्धा योग्य काम करत नसल्याचा आरोप
तालुक्यातील लाभार्थ्यांना दिव्यांग प्रमाणपत्रासाठी चंदगड येथे शिबिर घेण्याचे नियोजन ः सभापती नाईक
-----------------
चौकट
‘गायरानमध्ये काजू लागवडीचे नियोजन करा’
सामाजिक वनीकरण विभागामार्फत तीनशे कोटी वृक्षलागवड योजना राबविली जात आहे. त्यासाठी शासकीय पडजमीन उपलब्ध व्हावी म्हणून पत्रव्यवहार केला आहे. मात्र, अद्याप प्रतिसाद मिळाला नसल्याचे अधिकारी दत्ता पाटील यांनी सांगितले.‌ गायरान जमीन उपलब्ध झाल्यास ही योजना प्रभावी राबविता येईल, असे स्पष्ट केले. त्यावर या ठिकाणी काजू पिकाची लागवड केल्यास ग्रामपंचायतीला वार्षिक आर्थिक उत्पन्न मिळेल. त्या दृष्टीने नियोजन करावे, अशी सूचना सभापती नाईक यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

JP Nadda: आरक्षण हटाओ आंदोलन! शिष्टमंडळाने घेतली जेपी नड्डांची भेट; 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा

Marathi News Live Updates : नेपाळमधून जी दृश्ये समोर येत आहेत, ती अत्यंत विनाशकारी आणि हृदयद्रावक आहेत - आदित्य ठाकरे

WTC 2025-27: भारतीय संघाचं गणित बिघडलं! श्रीलंकेविरुद्धच्या 'ड्रॉ'नंतर Points Table मध्ये टीम इंडिया कोणत्या स्थानावर

Marathi Language Rule: ऑटो-टॅक्सी चालकांना दिलासा! मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदत; देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय

Car Care Tips: कारमध्ये फोन चार्ज करताय? 'या' ४ चुकांमुळे मोबाईलचा ब्लास्ट अन् कारची बॅटरी होऊ शकते डेड!

SCROLL FOR NEXT