कोल्हापूर

संयमी नेता डॉ. विनय कोरे

CD

संयमी नेतृत्व
शांत, संयमी, मितभाषी, कणखर, कल्पक, चारित्रसंपन्न आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून महाराष्ट्राच्या सहकाराबरोबरच राजकारणात वेगळा ठसा उमटवणारे जनसुराज्य शक्ती पार्टी पक्षाचे संस्थापक मा. आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांचा आज वाढदिवस. जनहितार्थ पारदर्शक कारभार, सहकाराचा प्रचंड अभ्यास, जनमानसात स्वच्छ प्रतिमा असणारा, राजकारणात दिलेला शब्द नुकसान किंवा फायदा याचा कोणताही विचार न करता पाळणारा अजातशत्रू नेता. तसेच जनसुराज्य पक्षाच्या माध्यमातून संस्कार, सिद्धी, संकल्प असा वेगळा विचार महाराष्ट्राला देऊ पाहणारे नेतृत्व म्हणजे विनय कोरे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त...
- उत्तम महाडिक, देवाळे
------------------------------

सहकारमहर्षी स्वर्गीय तात्यासाहेब कोरे यांच्या विचार व कार्याच्या सुगंधाची दरवळ असणाऱ्या संपन्न कुटुंबात ४ ऑक्टोबर १९७१ मध्ये डॉ. विनय कोरे यांचा जन्म झाला. आजोबा तात्यासाहेब व वडील विलासराव कोरे यांच्या निधनाने लहानवयातच वारणा सहकार व उद्योगसमूहाची जबाबदारी विनय कोरे यांच्या खांद्यावर आली. बंधू निपूणदादा व मातोश्री शोभाताई यांच्या सहकार्याने त्यांनी ती लीलया पेलली. सहकार वाढवायचा असेल तर त्याला सत्तेची जोड हवीच याचा अभ्यास करून १९९४ मध्ये सलग २५ वर्षे निवडून आलेल्या दिवंगत माजी आमदार यशवंत एकनाथ पाटील (दादा) यांच्यासारख्या बलाढ्य व लोकप्रिय आमदारांविरोधात उभे राहण्यासाठी ताकद आजमावण्यासाठी त्यांनी बंधू निपूण कोरे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. सर्व मतदारसंघ पिंजून काढला आणि सहकारातील ठसा मतदारांच्या मनात उतरवून १९९९ मध्ये त्यांनी पूर्वीच्या पन्हाळा - गगनबावडा - वैभववाडी मतदार संघातून विधानसभेची राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवून आमदार झाले. आमदारकीच्या काळात झालेल्या नाटयमय घडामोडींनंतर अनुभवाच्या जोरावर व अगदी तरूणवयातच त्यांनी नवीन पक्षाची स्थापना केली. संकल्प, संस्कार, सिद्धी व सुराज्य हे घोषवाक्य घेऊन त्यांनी जनसुराज्य शक्ती पक्षाची स्थापना केली. स्वतःचा पक्ष काढल्यावर त्यांनी इतर पक्षांचे सहकार्य न घेता स्वतःच्या ताकदीवर २००४ मध्ये पक्षाचे चार आमदार निवडून आणून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारमध्ये अपारंपरिक ऊर्जा व फलोत्पादन मंत्रीपद पटकावले. या काळात त्यांनी जिल्ह्याबरोबर महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतंत्र अस्तित्त्व निर्माण केले. मतदारसंघ बदलून शाहूवाडी - पन्हाळा असा नवीन मतदारसंघ तयार झाला. तेथेही त्यांना तीनपैकी दोन निवडणुकांमध्ये विजयी करून नवमतदारांनीही त्यांच्यावर विश्वास दाखविला. जिल्हा बँक, जिल्हा परिषद, गोकुळ दूध संघ, महानगरपालिका, बाजार समिती यासारख्या जिल्ह्याच्या विविध क्षेत्रांत दबदबा निर्माण केला. जनतेच्या अडचणी व कामाप्रती अतिशय संवेदनशील असे हे नेतृत्व पन्हाळा तालुक्याला लाभले. त्यांच्या नेतृत्वामुळे केवळ वारणेचेच नव्हे तर जिल्ह्याचे नाव देशात अग्रणी झाले आहे.
---
चौकट
‘शब्द’ पाळणारा नेता
राजकीय जीवनामध्ये ‘शब्द’ पाळणारा प्रगल्भ नेता म्हणून त्यांचा मोठा नावलौकिक आहे. कितीही संकटे आली, नुकसान झाले तरी दिलेल्या शब्दांत सावकरांनी कधीच तडजोड केली नाही. जिल्ह्याच्या राजकारणात याची प्रचिती वेळोवेळी सर्वांना येते. सत्तेत असो अगर नसो; पण सोबत असणाऱ्या सामान्य व गरीब कार्यकर्त्याला नेहमी बळ देण्याचे काम त्यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik FDA: नाशिकमध्ये FDA चा मिठाई व्यावसायिकांना दणका! पाच प्रमुख स्वीट्स उत्पादकांचे परवाने निलंबित, कारवाईने खळबळ

Solapur Crime: वयोवृद्ध दाम्पत्य पोर्चमध्ये झोपले अन् चोरट्यांनी डाव साधला! पोखरापूरमध्ये ४.२७ लाखांचा ऐवज लंपास

Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांच्या पराभवाने भारताला किती फायदा होणार? टॅरिफ, ट्रेड डील आणि रशियाशी संबंधित निर्बंधांवर काय परिणाम होईल?

Maharashtra Dam Storage: राज्यातील धरणांमध्ये २३ टक्के पाणीसाठा कमी; गेल्या वर्षीच्या तुलनेतील स्थिती, मराठवाड्यातील जलसाठ्याची स्थिती चिंताजनक

Ambani family Diwali Celebration : सासू-सुनेचा असा राजेशाही अंदाज कधी पाहिला नसेल! एका बाजूला लाल सिल्क साडी, तर दुसऱ्या बाजूला जांभळा ड्रेस; फॅशन पाहून चाहते थक्क

SCROLL FOR NEXT