कोल्हापूर

झापाचीवाडी प्रकल्पाची प्रलंबित कामे वेगाने सुरू

CD

00890

झापाचीवाडी बंधाऱ्याची
प्रलंबित काम गतीने
मेअखेर पूर्णत्वाला; ग्रामस्थांत समाधान
धामोड, ता. ८ : झापाचीवाडी (ता. राधानगरी) येथील लघु पाटबंधारे प्रकल्पावरील प्रलंबित कामे वेगाने सुरू आहेत. प्रकल्पाच्या मुख्य भिंतीचे अश्मपटल दगडी काम, सांडव्याचे अपुरी असलेली कामे गतीने सुरू असून मे महिन्याअखेर पूर्णत्वाला जाणार आहेत. त्यामुळे ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे.
झापाचीवाडी पाटबंधारे प्रकल्प अनेक वर्षे रेंगाळला होता. निधीची पूर्तता नसल्याने लालफितीत अडकला होता. या प्रकल्पाचा तीन गावांना व अडीचशे हेक्टर शेती क्षेत्राला लाभ झाला आहे. यावर्षी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असून प्रकल्पाचे पाणी पूजन करण्यात आले. मात्र अद्यापही या प्रकल्पाचे अनेक कामे प्रलंबित होती. प्रकल्पाच्या मुख्य भिंतीवरील दगडी काम दगडी, पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर प्रकल्पातून बाहेर जाणाऱ्या अतिरिक्त पाण्यासाठी तयार करण्यात आलेला सांडवा यांची कामे प्रलंबित होती. गत आठवड्यापासून ही कामे वेगाने सुरू आहेत. सध्या मुख्य भिंतीच्या दगडी बांधकामाचे काम अंतिम टप्प्यात आहे. सांडव्यातील प्रलंबित कामेही सुरू करण्यात आलेले आहेत. प्रकल्पावरील प्रलंबित कामांना वेग आला असून ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे.
------------
कोट
हा प्रकल्प जलसंधारण विभागाकडून सुरू आहे. या प्रकल्पात प्रथमच पाणी अडवलेले असून काही कामे प्रलंबित होती. मुख्य भिंतीचे दगडी काम, सांडव्याचे प्रलंबित असलेली कामे मे महिनाअखेरीस पूर्णत्वाला जाणार आहेत.
- एम. एस. पाटील, प्रकल्प ठेकेदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पंखा लावण्यावरून वाद; महाराष्ट्रातील मोठ्या विद्यापीठात तरुणीचं विद्यार्थिनीसोबत भयंकर कृत्य, पोलिसांवरही दबाव...

Pune News : एम्प्रेस गार्डनच्या जागा हस्तांतरणाला विरोध; हरित वारशाच्या रक्षणासाठी जनआंदोलन उभारण्याचे आवाहन

Flight Guidelines: विमानाच्या उड्डाणासाठी नवे नियम जाहीर! पायलटचा निर्णय अंतिम असणार; दबाव टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई

Katraj News : भारती विद्यापीठ भागात हॉटेलमध्ये गॅस गळतीमुळे भडका; चारजण जखमी

Manchar Crime : मंचर येथे प्रांत अधिकारी गोविंद शिंदे यांना दोन लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले; एसीबीची कारवाई

SCROLL FOR NEXT