कोल्हापूर

केळोशी गेटेड बंधारे बाबत आमदारांची बैठक

CD

‘लोंढा नाला’च्या गेटेड बंधाऱ्यांबाबत
दिरंगाई खपवून घेणार नाही ः आबीटकर

धामोड,ता .२४ :केळोशी बुद्रुक (ता. राधानगरी) येथील लोंढा नाला लघू पाटबंधारे प्रकल्पावरील गेटेड बंधारे शेतकऱ्यांना सिंचनाच्या दृष्टीने हितावह आहेत. कामाबाबत दिरंगाई झाल्यास लोकप्रतिनिधींना जनतेच्या रोषाना सामोरे जावे लागते. त्यामुळे या कामाबाबत कोणत्याही पद्धतीची दिरंगाई खपवून घेणार नाही असे आमदार प्रकाश आबीटकर यांनी सांगितले.
केळोशी बुद्रुक येथील गेटेड बंधाऱ्याच्या कामाबाबत आमदार व शासकीय अधिकारी यांच्यामध्ये कोल्हापूर शासकीय विश्रामगृह येथे बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. ''सकाळ''मध्ये लोंढा नाला लघु पाटबंधारे प्रकल्पावरील गेटेड बंधारे अडकले नात्यागोत्यात या मथळ्याखाली वृत्तमालिका प्रसिद्ध झाली होती. या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली. उपविभागीय अभियंता उदय स्वामी, सहाय्यक अभियंता सोनाली दिघे, ठेकेदार संतोष पाटील, उद्धव वाळके, श्रीकांत पाटील, श्री सावंत, श्री. बिडीकर उपस्थित होते.
आमदार आबीटकर म्हणाले, ‘कामासाठी २९ जून २०२२रोजी ९ कोटी ७८लाख ४४ हजार ६२२ रुपये मंजूर होते. शासनाने ३१ मार्च २०२३ पूर्वी खर्च करण्यास सुधारित प्रशासकीय मान्यता दिली असताना एकूण १९ बंधाऱ्यापैकी दोन बंधाऱ्यांची कामे पूर्ण होऊनही बिले अदा का केली नाहीत? याबाबत शासकीय अधिकारी निरुत्तर झाले.

चौकट
आज पुन्हा बैठक
बैठकीला कार्यकारी अभियंता एस. आर. पाटील उपस्थित नसल्याने उद्या मंगळवार (ता. २५ ) रोजी चार वाजता पुन्हा बैठक बोलावली असल्याची माहिती आमदार प्रकाश आबीटकर यांनी दिली .

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT