कोल्हापूर

केळोशीत शेतकऱ्यांचा मृतदेह आढळला

CD

01121
...
केळोशीत लोंढा नाला प्रकल्पामध्ये
शेतकऱ्याचा मृतदेह तरंगताना आढळला

धामोड , ता. २७ : केळोशी बुद्रुक (ता. राधानगरी) येथील लोंढा नाला प्रकल्पामध्ये एका शेतकऱ्याचा मृतदेह तरंगताना आढळला. विलास भाऊ मगर (वय ५३) असे त्यांचे नाव आहे. ते बुधवारपासून बेपत्ता होते. राधानगरी पोलिसांत घटनेची नोंद झाली आहे.
केळोशी बुद्रुक येथील विलास भाऊ मगर हे बुधवारी (ता. २४) सायंकाळी साडेसहा वाजता घरातून काही न सांगता निघून गेले होते. त्यांचा नातेवाईकांनी परिसरात शोध घेतला. मात्र, ते आढळून आले नसल्याने राधानगरी पोलिसांत बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली होती. आज शनिवारी (ता. २७) सकाळी दहा वाजता केळोशी येथील लोंढा नाला धरण प्रकल्पाच्या पाण्यात त्यांचा मृतदेह तरंगताना आढळून आला. सोळांकूर ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. अधिक तपास पोलिस नाईक अरविंद पाटील, सचिन पारखे, कृष्णात खामकर करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

Waluj Nagar Accident : हळद लागण्यापूर्वीच काळाने घातली झडप, दुचाकीच्या अपघातात तरुण ठार

IPL 2024, KKR vs DC Live Score: अक्षर पटेलने दिल्लीला मिळवून दिलं पहिलं यश; सुनील नारायण स्वस्तात बाद

''सत्तेत आल्यास जातनिहाय आणि आर्थिक सर्वेक्षण करू.. राज्य घटना बदलण्याचा भाजप आणि संघाचा कट'', काय म्हणाले राहुल गांधी?

Satara : कऱ्हाडला घुमला 'मोदी...मोदी'चा नारा; महायुतीच्या नेत्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन, रखरखत्या उन्हातही मोठा उत्साह

SCROLL FOR NEXT