कोल्हापूर

खडतर पायवाटेने दाखविला यशाचा मार्ग

CD

01587
प्रतीक्षा मांगोरे
.........
खडतर पायवाटेने
दाखविला यशाचा मार्ग

केरबा जाधव ः सकाळ वृत्तसेवा
धामोड, ता. २१ : आई-वडील शेतकरी, घरात अठरा विश्व दारिद्र्य, कॉलेजसाठी सोबत कोणीही गावातील विद्यार्थिनी नसतानाही दररोज आठ किलोमीटरची पायपीट करून येथील सह्याद्री हायस्कूल व जुनिअर कॉलेजची विद्यार्थिनी प्रतीक्षा संजय मांगोरे हिने बारावी परीक्षेत ७६.५० टक्के गुण मिळविले. तिचे यश विद्यार्थ्यांना प्रेरणादायी आहे.
राधानगरी तालुक्याचा पश्चिम परिसर सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यांत विखुरला आहे. केळोशी बुद्रुक पैकी माळवाडी येथील प्रतीक्षाला बारावीचे शिक्षण घेण्यासाठी धामोड येथील सह्याद्री हायस्कूल व जुनिअर कॉलेजमध्ये यावे लागत होते. दळणवळणाची कोणतीही सोय नसल्याने तिला दररोज आठ किलोमीटरची पायपीट करत कॉलेजला जावे लागत असे. त्यातच गावातील बारावीमध्ये शिकणारी ती एकटीच विद्यार्थिनी असल्याने सोबत कोणीही नसताना तिने ही पायवाट यशाची बनवली. जिद्द, मेहनतीच्या बळावर तिने कोणतीही खासगी शिकवणी न लावता हे यश मिळवले. नियमित सराव, अभ्यास करा. जीवनात संकटांना सामोरे जात आपण आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. त्यासाठी संयम आणि प्रार्थनेचीही आवश्‍यकता असते, असे प्रतीक्षाने ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.
..............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, थांबलेल्या ट्रकला कारची धडक; माय-लेकीचा मृत्यू, बाप-लेक गंभीर जखमी

Gokul Dudh Sangh Politics : मुश्रीफांना घेऊनच महायुतीचे पॅनेल, आमदार शिवाजी पाटील यांचा पत्ता कट?; गोकुळच्या बैठकीतील इनसाईड स्टोरी

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींना मोठा धक्का ! ८० लाख महिलांचा लाभ बंद, आता ई-केवायसीलाही मुदवाढ नाही; नेमकं कारण काय?

Rajesh Tope: शरद पवार गटाला धक्का? राजेश टोपे खरंच भाजपमध्ये जाणार? अखेर स्वतः टोपेंनीच दिलं स्पष्ट उत्तर!

Konkan Railway: ‘वंदे भारत’, ‘तेजस’च्या फेऱ्यांत १५ जूनपासून कपात; कोकण रेल्वे मार्गावर मॉन्सून वेळापत्रक, गाड्यांच्या वेळाही बदलणार

SCROLL FOR NEXT