1776
धामोड : धामोड-शिरगाव मार्गावरील तुळशी नदीजवळील धोकादायक वळण. (छायाचित्र : केरबा जाधव)
.................
तुळशी नदीजवळील धोकादायक
वळणाचे तातडीने रुंदीकरण करा
वारंवार निवेदने देऊनही सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
सकाळ वृत्तसेवा
धामोड, ता. ३० : धामोड-शिरगाव (ता. राधानगरी) मार्गावर तुळशी नदीजवळ असणाऱ्या धोकादायक वळणामुळे अपघाताचे प्रकार घडत आहेत. या धोकादायक वळणावर रुंदीकरण करावे, अशी मागणी प्रवाशी व नागरिकांतून होत आहे. याबाबत सातत्याने मागणी करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले आहे.
धामोड-शिरगाव हा चार किलोमीटरचा मार्ग राधानगरी तालुक्याला जोडणारा असून, या मार्गावर नेहमीच वर्दळ असते. मार्गावर अनेक ठिकाणी धोकादायक वळणे आहेत. तुळशी नदीजवळ असणाऱ्या धोकादायक वळणावर सातत्याने छोटे-मोठे अपघात घडतात. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला येथील ग्रामस्थांनी लेखी निवेदन दिले आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले आहे.
गेल्या आठवड्यात तुळशी नदीजवळील धोकादायक वळणावर मोटारचालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने ती उलटली. रस्त्याच्या बाजूला तुळशी नदीचे वीस फुटांचे पात्र आहे. केवळ दैव बलवत्तर म्हणून जीप मोटारीमधील सर्व प्रवासी वाचले. एखाद्याचा जीव गेल्यानंतर संबंधित विभागाला या धोकादायक वळणाची दुरुस्ती करण्यास जाग येणार काय, असा प्रश्न येथील जनतेतून विचारला जात आहे.
.....
कोट...
तुळशी नदीजवळ असणारे वळण धोकादायक आहे. त्या ठिकाणी रस्ताही अरुंद आहे. लेखी निवेदन देऊनही सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे. एखादी मोठ दुर्घटना घडण्यापूर्वी हे धोकादायक वळण काढावे.
- दीपक भामटेकर, सामाजिक कार्यकर्ते, धामोड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.