कोल्हापूर

कुरणेवाडी जपला मर्दानी खेळांचा वारसा

CD

1854
धामोड (ता. राधानगरी) ः येथे मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सादर करताना मुले.
............
कुरणेवाडी जपला मर्दानी खेळांचा वारसा

तरुणाईला मिळतेय दांडपट्टा, लेझीम, तलवारबाजीचे प्रशिक्षण

सकाळ वृत्तसेवा
धामोड, ता. ३ : धामोड पैकी कुरणेवाडी (ता. राधानगरी) गावाने अद्यापही मर्दानी खेळाचा वारसा जपला आहे. तिसरी क्रांती म्हणून समजल्या जाणाऱ्या मोबाईलच्या युगात कला लुप्त होता असताना या गावाने पारंपरिक कलांना नवजीवन दिले आहे. काळजाचा ठोका चुकवणाऱ्या दांडपट्ट्यासह मर्दानी कला जोपासणारे गाव म्हणून गावाची ओळख आहे.
धामोड ग्रामपंचायतीअंतर्गत या गावाचा समावेश होतो. गावची लोकसंख्या ६०० च्या आसपास आहे . गावाला ५२ उंबरा असून, प्रत्येक घरातील कर्ता माणूस मर्दानी खेळात पारंगत आहे. तालुक्याच्या पश्चिम परिसरातील सधन आणि बागायतदार अशी या गावाची गेल्या अनेक वर्षांपासून ओळख आहे. अशा या गावाने लाल मातीची परंपरा परिसरात पहिल्यांदा जोपासली. ‘पैलवानांचे गाव’ असा ठसा काही दिवसांतच या गावाने उमटवला. येथील अनेक पैलवानांनी जिल्ह्यात कुस्तीत नाव कमावले आहे.
पारंपरिक लेझीम, लाठीकाठी, दांडपट्टा, तलवारबाजी अशा शारीरिक आणि मानसिक बळ देणारे खेळ जोपासले असून ग्रामीण पारंपरिक गावगाड्यात या कला नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. मात्र, पूर्वजांकडून मिळालेली ही पारंपरिक कला जिवंत ठेवण्यासाठी येथील तरुणाई ही कला जोपासत आहे.
येथील पूर्वज दांडपट्टा, तलवारबाजीमध्ये तरबेज होते. त्यांचा वारसा आजही अनेकांनी पुढे चालवला आहे. हा मैदानी खेळाचा वारसा केवळ गावापुरता मर्यादित न ठेवता अनेकांकडून या कलेचे ज्ञान विनामोबदला दिले जाते. दांडपट्टा खेळात हरणासारखी चपळता लागते. तसेच मागची उडी, वळन उडी, दांडपट्ट्याची फेक यांना विशेष महत्त्व असते. या कलेत पाखरासारखे चातुर्य, कौशल्याचे सामर्थ्य यांचा कस लागतो.
गावातील कार्यक्रमांमध्ये साउंड सिस्टीमला फाटा देत पारंपरिक लेझीम, दांडपट्टा कला सादर केल्या जातात. त्यामुळेच धामोडसारख्या मध्यवर्ती ठिकाणीसुद्धा येथील वस्तादांकडून ही कला शिकवली जाते. त्यामुळे या परिसरात पारंपरिक साहसी खेळांकडे तरुणाईचा कल वाढला आहे.
...
कोट...
आपल्या भावी पिढीला दांडपट्टा, लेझीम, तलवारबाजी या कला समजाव्यात व त्यांनीही त्या अधिक समृद्ध कराता याव्यात यासाठी माझी वैयक्तिक जबाबदारी आहे. त्यामुळेच गेल्या दहा वर्षांपासून ही कला जतन करत आहे. गावातील लोक आम्हाला प्रोत्साहन देऊन सहकार्य करतात. पारंपरिक कला टिकावी यासाठी आमचा हा छोटासा प्रयत्न.
लक्ष्मण खोत, वस्ताद, कुरणेवाडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table मध्ये उलथापालथ; राजस्थानचा नेट रन रेट घसरला, CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळा

RR vs DC Live: 'चिमणी उडे, कावळा उडे'! पृथ्वी शॉ याच्यावर आली ही वेळ... सचिन, लारा यांच्यासोबत तुलना व्हायची आज तोच... Video

RR vs DC Live: रवींद्र जडेजाने 'बॅट'उगारली, कुलदीप यादवने दिला धक्का... नेमकं काय घडलं? Viral Video ची चर्चा...

Plane Crash: मोठा अपघात! हिल कंट्रीमध्ये विमान कोसळले; ५ जणांचा मृत्यू, कशी घडली घटना?

AIDS Report : सांगलीत संतापजनक प्रकार! मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी महिला गेली अन् एड्सचा पॉझिटिव्ह रिपोर्ट मिळाला; चुकीचा अहवाल दिल्याने डॉक्टरवर गुन्हा

SCROLL FOR NEXT