कोल्हापूर

खाउच्या पानांना नवरात्रोत्सवामुळे उच्चांकी दर

CD

खाऊच्या पानांना नवरात्रोत्सवामुळे उच्चांकी दर
प्रतिडाग सातशे ते दोन हजार रुपये : राज्यभरातून मागणी; शेतकरी सुखावला
युवराज पाटील ः सकाळ वृत्तसेवा
दानोळी, ता. १३ ः रविवार (ता. १५) पासून नवरात्रोत्सव सुरू होत आहे. या काळात पूजा-अर्चा आदी धार्मिक विधीमुळे सध्या बाजारपेठेत खाऊच्या (विडा) पानांना उच्चांकी दर मिळत आहे. आता एका डागाला सातशेपासून पंधराशेपर्यंत भाव मिळत आहे. काही मोठ्या पानांना दोन हजार रुपयांपर्यंत उच्चांकी भाव मिळत आहे. चार दिवसांपासून हा दर मिळत असून सध्या वडगाव बाजार समितीत (इचलकरंजी) आठवड्यात ७०० ते १००० डागांची आवक होत आहे.
नवरात्रोत्सवामध्ये खाऊच्या पानाला चांगला दर मिळतो. कोरोनात दीड वर्ष पानाच्या दरात घसरण झाली होती. पानांची बाजारपेठच बंद पडलेली. दीड वर्षात पानांना सरासरी भाव मिळत असून आता दराने उच्चांकी गाठला आहे. इचलकरंजी बाजार समितीत शिरोळ, हातकणंगले तालुक्यासह कर्नाटक सीमाभागातून पानाची आवक होते. आठवड्यातून सोमवार, बुधवार व शुक्रवार असे तीन वेळा सायंकाळी बाजार असतो. येथून स्थानिक बाजारपेठेसह कराड, सातारा, पुणे, कोकण, धुळे, जळगाव या भागात पाने पाठवली जातात.
तीन हजार पानांचा एक डाग असतो. बाजारात टोंगळ, सरपट व कळीच्या पानांना वेगवेगळा दर असतो. त्यामुळे पानाचे प्रकार व आकार यानुसार पानांना भाव मिळत आहे. सणामुळे पानांना भाव मिळत असल्याने शेतकरी सुखावला आहे.
-------------
सध्या खाऊच्या पानाचे दर वधारले आहेत. सणामुळे पानांना मागणी वाढली आहे. मागील बाजारापेक्षा यावेळी दर वाढून मिळाला आहे. या हंगामात हा चांगला दर असून चांगले पान पुरवण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत.
- अक्षय पाटील, पान उत्पादक शेतकरी, निमशिरगाव
------------------
नवरात्रोत्सवात विड्याच्या पानांना राज्यातून मागणी असते. येथून कोकणसह विदर्भ व पुणे भागात पाने पाठवली जातात. त्यामुळे या काळात पानांना चांगला भाव मिळतो.
- सदाशिव वाळवेकर, व्यापारी- वडगाव बाजार समिती, इचलकरंजी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: एलपीजी गॅसला पर्याय सापडलेलं डायमिथाईल इथर नेमकं काय आहे? पुण्यातल्या शास्त्रज्ञांच्या हाती मोठं यश

CA Exam : टेलर व्यावसायिकाचा मुलगा झाला ‘सीए’; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले यश

Beed Crime: अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार करुन खांबाला बांधलं; लोकांनी सोडवण्याऐवजी व्हिडीओ शूट केले

Nasrapur Accident : भरधाव डंपरने दुचाकीला मागून ठोकरले; अपघातात आजोबा, नातीचा मृत्यू

Prakash Ambedkar : एपस्टिन प्रकरणाबाबत संघाला जाब विचारणार; २३ मार्चला नागपुरात आंदोलन

SCROLL FOR NEXT