विवाहितेचा छळ; चौघांविरोधात गुन्हा
गांधीनगर : माहेरहून व्यवसायासाठी पंधरा लाख घेऊन ये, अशी मागणी करत अनिका सुरज होतवानी (वय २५, आचार्य कॉलनी, वळीवडे) या विवाहितेचा मारहाण, शिवीगाळ करत छळ करणाऱ्या पती सुरज नारायणदास होतवानी, सासरे नारायणदास श्रीचंदमल होतवानी, चुलत सासरे महेश श्रीचंदमल होतवानी, चुलत सासू रिंकू महेश होतवानी (चौघेही रा.आचार्य कॉलनी, वळीवडे) यांच्यावर गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सौ अनीका यांचा लग्न झाल्यापासून १२ जून २०२३ अखेर हे चौघेजण छळ करत होते. वारंवार तिला शिवीगाळ करत मारहाण करत असत. माहेरहून व्यवसायासाठी पंधरा लाख रुपये घेऊन ये, न आणल्यास तुला नांदवणार नाही, अशी धमकी देत अनिकाला माहेरी हाकलून दिले. याबाबत अनिका सुरज होतवानी यांनी फिर्याद दिली असून चौघांवर विवाहितेच्या छळाचा गुन्हा गांधीनगर पोलीस ठाण्यात नोंद झाला आहे. अधिक तपास हवालदार कांबळे करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.