तहसीलदारांच्या बनावट सही,
शिक्क्याचा वापर, एकाविरोधात गुन्हा
गांधीनगर, ता.१८ः करवीर तहसीलदारांची सही आणि शिक्क्यांचा वापर करुन बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी प्रकाश नारायण जाधव (रा. शिवाजी पेठ, कोल्हापूर) याच्याविरोधात उचगावचे तलाठी शरद आप्पासो पाटील यांनी गांधीनगर पोलिसांत फिर्याद दिली. याबाबत प्रकाश जाधव याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी , उचगावचे तलाठी शरद पाटील यांच्याकडे २१ मार्च २०२३ रोजी उचगाव येथील सर्व्हे नं. ३२२ मधील त्यांचे आणि इतर व्यक्तींच्या नावे असणारे ७५ आर क्षेत्र भोगवटादार वर्ग २ मधून वर्ग १ करण्याबाबत अर्ज दिला होता. अर्जासोबत करवीर तहसीलदार कार्यालयाकडील आदेश जोडला होता. तसेच कसबा बावडा मंडल अधिकाऱ्यांनी ही नोंद प्रमाणित केली होती. परंतु या आदेशाबाबत शंका निर्माण झाल्याने तलाठी पाटील यांनी करवीरच्या तहसिलदारांकडे पडताळणीसाठी अहवाल सादर केला. तहसीलदार करवीर यांनी आदेशाची पडताळणी केली असता तत्कालीन तहसिलदार शीतल मुळे भामरे यांची सही आणि शिक्का बनावट असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यामुळे तलाठी शरद पाटील यांनी प्रकाश जाधव याच्याविरोधात फसवणुकीची फिर्याद दिली असून याबाबत अधिक तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल दिलीप दळवी करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.