कोल्हापूर

सिद्धांत जाधवला सर्वाधिक बोली

CD

gad233.jpg
90787
भडगाव : फुटबॉल लिगसाठी बोलीचे नारळ फोडून रामाप्पा करिगार उद्‍घाटन केले. रविशंकर बंदी, अनिकेत कोणकेरी, उदय पूजारी आदी उपस्थित होते.
-----------------------------------------

सिद्धांत जाधवला सर्वाधिक बोली
भडगाव फुटबॉल लिग; ८८ खेळाडूंचा लिलाव; नागनाथ चौगुले, संदेश चोथेला मागणी
गडहिंग्लज, ता. २३ : चुरशीच्या झालेल्या समारंभात फुटबॉलपटू सिद्धांत जाधवला सर्वाधिक बोली लागली. पाठोपाठ नागनाथ चौगुले, संदेश चोथे, गुरुराज पाटगावे, विशाल चौगुले, राकेश चिलमी यांना मागणी राहिली. एकुण ८८ खेळाडूंची लिलाव झाला. भडगाव (ता. गडहिंग्लज) येथील भडगाव फुटबॉल क्लबमार्फत होणाऱ्या फुटबॉल लिगसाठी हा बोलीचा कार्यक्रम झाला. बसवेश्वर चौकात झालेल्या कार्यक्रमाला खेळाडू, पालक आणि क्रीडा शौकिनांची गर्दी होती.
जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामाप्पा करिगार यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून बोलीचे उद्‍घाटन केले. उपसरपंच रवीशंकर बंदी, अनिकेत कोणकेरी, संघ मालक महादेव बंदी, विठ्ठल पूजारी, भाग्यवंत मोरे, विनोद चौगुले, बशीर शेख, राजकुमार पाटील, विजय पट्टणकुडी, सागर कोरी, संजय पाटील उपस्थित होते. गडहिंग्लज युनायटेडचे सचिव दीपक कुपन्नावर यांनी बोलीच्या नियमांची माहिती दिली. अर्जेटिना, इग्लंड, फ्रान्स, जर्मनी, स्पेन, पोर्तुगाल, ब्राझील, भारत या संघाचे किट सहभागी संघांना ड्रॉद्वारे निवडले. सुरवातीला ड्रॉद्वारे संघाचे प्रशिक्षक म्हणून सुरज तेली, यासीन नदाफ, ओमकार सुतार, सुल्तान शेख, सागर पोवार, प्रथमेश धबाले, अनिकेत कोले, सुरज कोंडूस्कर यांची निवड झाली. पहिल्या सत्रात आयकॉन खेळाडूंना बोली लागली. यात सिद्धांत जाधवला सर्वाधिक दोन हजार गुणांनी एसबी आर्मी संघाने करारबद्ध केले. खेळाडूत नागनाथ चौगुले (१६००), संदेश चोथे (१५००), गुरुराज पाटगावे, विशाल चौगुले (१४००), राकेश चिलमी ( ११०० गुण) मिळवून वर्चस्व राखले. श्रीधर चौगुले, महेश राजगोळे, देवराज धनवडे, अर्थव सावेकर यांच्यासाठीही बोली रंगली. एकुण ८८ खेळाडूंना आठ संघात बोलीव्दारे सामावून घेण्यात आले. अभिजित चव्हाण, सौरभ जाधव यांनी बोलीची प्रक्रिया झाली. स्पर्धा समन्वयक महेश हासुरे यांनी स्वागत केले. मारूती साळवेकर यांनी प्रास्ताविक केले. पोलिस पाटील उदय पूजारी यांनी आभार मानले.
--------------
कमालीची चढाओढ
फुटबॉलपटू घेण्यासाठी आठ संघात कमालीची चढाओढ रंगली. आपलाच संघ बळकट व्हावा यासाठी संघ मालकातील चुरस उपस्थितांची उत्कंठा वाढवणारी ठरली. आपल्याला किती बोली लागणार याची उत्सुकता खेळाडूंना होती. अडीच तास हा कार्यक्रम रंगला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

Waluj Nagar Accident : हळद लागण्यापूर्वीच काळाने घातली झडप, दुचाकीच्या अपघातात तरुण ठार

IPL 2024, KKR vs DC Live Score: अक्षर पटेलने दिल्लीला मिळवून दिलं पहिलं यश; सुनील नारायण स्वस्तात बाद

''सत्तेत आल्यास जातनिहाय आणि आर्थिक सर्वेक्षण करू.. राज्य घटना बदलण्याचा भाजप आणि संघाचा कट'', काय म्हणाले राहुल गांधी?

Satara : कऱ्हाडला घुमला 'मोदी...मोदी'चा नारा; महायुतीच्या नेत्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन, रखरखत्या उन्हातही मोठा उत्साह

SCROLL FOR NEXT