कोल्हापूर

जीवन कौशल्यासाठी खेळा

CD

gad26.jpg
99966
गडहिंग्लज : युनायटेड फुटबॉल प्रशिक्षण शिबिरातील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा सत्कार सुखदेव पाटील यांनी केला. मल्लिकार्जून बेल्लद, संजय संकपाळ, सुरेश कोळकी, अलीखान पठाण आदी उपस्थित होते.
--------------------------------

जीवन कौशल्यासाठी खेळा
सुखदेव पाटील : गडहिंग्लज युनायटेड उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचा समारोप
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ३ : खेळातून आपल्याला अनेक गोष्टी शिकायला मिळतात. महत्वाचे म्हणजे संघर्ष करण्याचे धडे केवळ खेळच तुम्हाला शिकवू शकतो. सर्वांना घेऊन ध्येय कसे गाठायचे सराव खेळातूनच होतो. हार जीत पचवण्याची मानसिकता खेळच तयार करू शकतो. म्हणूनच विद्यार्थ्यांनो जीवन कौशल्ये शिकण्यासाठी मैदानी खेळ खेळा, असा सल्ला आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू सुखदेव पाटील यांनी दिला.
येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन आणि रावसाहेबआण्णा कित्तुरकर विश्वस्त संस्थेमार्फत उन्हाळी फुटबॉल प्रशिक्षण शिबिरात ते प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते. पंधरा दिवस एम. आऱ. हायस्कुलच्या मैदानावर झालेल्या शिबिरात दोनशे वीस नवोदितांनी सहभाग घेतला. शिबिराचे यंदाचे चोविसावे वर्ष होते. सर्वोत्कृष्ट शिबिरार्थी म्हणून साईराज सासने, कृतिका कुराडे, वेदांत देवार्डे, सोबान याकुबशहा, वेदांत पोतदार, सुमित पनोरी यांचा क्रीडा साहित्य देऊन सत्कार केला. शिबिर समन्वयक यासीन नदाफ, ओमकार सुतार, सुल्तान शेख यांचाही गौरव झाला. तालुका शिवसेनाप्रमुख संजय संकपाळ यांचे भाषण झाले. अरविंद कित्तुरकर, अलिखान पठाण, सिध्दार्थ गाताडे, विक्रम पाटील, महेश सुतार, अभिजित चव्हाण आदी उपस्थित होते. प्रशिक्षक दिपक कुपन्नावर यांनी प्रास्ताविकात शिबिरातील विविध उपक्रमांचा आढावा घेतला. सुरेश कोळकी यांनी आभार मानले. भुपेंद्र कोळी यांनी सूत्रसंचालन केले.
------------
यशाचा मंत्र सातत्य
शिबिरातून विद्यार्थ्यांत खेळाची आवड निर्माण होते. पण, सरावात सातत्य राखायला हवे. कारण, कोणत्याही क्षेत्रात यशवंत व्हायचे असेल तर प्रयत्नात सातत्य राखायला हवे. यशाचा हाच खरा मंत्र, असल्याचे श्री पाटील यांनी भाषणात सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसाची शक्यता

SSLC Exam Result : दहावी परीक्षेचा निकाल आज होणार जाहीर; 'या' वेबसाइटवर पाहू शकता Result

Sakal Podcast: शिरुर लोकसभेसाठी कुणाचं पारडं राहणार जड? ते सोमवारी इस्त्री न केलेले कपडे घालण्याची सूचना

Nagpur Earthquake : नागपूर जिल्ह्यात पुन्हा भूकंप; आठवड्याभरात चौथ्यांदा हादरली जमीन; नागरिक भयभीत

Panchang 9 May : आजच्या दिवशी दत्तगुरुंना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा

SCROLL FOR NEXT