कोल्हापूर

आय लीग फुटबॉल संघासाठी निविदा

CD

आय लीग फुटबॉल संघासाठी निविदा
‘एआयएफएफ’चा निर्णय; मुंबई, पुण्याचा समावेश, विकासाला चालना

दीपक कुपन्नावर : सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २५ : अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) देशभर फुटबॉल पोहचण्यासाठी कंबर कसली आहे. त्याचाच भाग म्हणून इंडियन फुटबॉल लिग (आय लिग) नव्या संघासाठी (कॉर्पोरेट) निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. त्यासाठी सोळा शहरांची दोन गटांत विभागणी केली आहे. यात राज्यातील मुंबई, पुण्याचा समावेश आहे. परिणामी, नव्या हंगामात नवे संघ दाखल होणार असून, फुटबॉलला चालना मिळणार आहे.
एआयएफएफच्या नव्या कार्यकारिणीने भारतीय फुटबॉल विकासासाठी ‘व्हिजन २०४७’ हा आराखडा बनविला आहे. सध्या केवळ काही राज्ये आणि शहरापुरता मर्यादित असणारा फुटबॉल सर्वत्र पोहचावा, यासाठी प्रयत्न आहेत. विविध विभागांतील अधिकाधिक संघ आणि हंगामभर स्पर्धा असेच त्याचे सूत्र आहे. त्यानुसार व्यावसायिक फुटबॉलची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या आय लिग प्रथम श्रेणी स्पर्धेत कॉर्पोरेट नव्या संघांना आवतन दिले आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे.
संघ अपेक्षित असणाऱ्या शहरांची दोन गटात विभागणी आहे. नवी दिल्ली, बंगळूर, पुणे, गुरगाव, चेन्नई, मुंबई, अहमदाबाद, गुवाहाटी आणि नोएडा यांचा पहिल्या गटात समावेश आहे. लुधियाना, फगवारा, कोईमतूर, मांजिरी, तिरुअंनतपुरम, भोपाल आणि शिलाँग दुसऱ्या गटात आहेत. निविदा अर्जाचे शुल्क पाच लाख रुपये, तर संघाला मान्यता मिळाल्यास किमान पाच कोटी रुपये भरावे लागणार आहेत. कॉर्पोरेट संघ दोन हंगाम गच्छंतीपासून मुक्त राहतील. गेल्या दशकभरात बंगळूर एफसी, मिनर्वा पंजाब एफसी, गोकलुम, सुदेवा दिल्ली एफसी, श्रीनिधी डेक्कन आदी कॉर्पोरेट एन्ट्रींतील कार्यरत संघ आहेत. डीएसके शिवाजीयन्स, भारत एफसी हे पुण्याचे संघ बंद पडले. संघ वाढल्याने अधिक फुटबॉलपटूंना संधीमुळे विकासाला चालना मिळणार आहे.

छोट्या गावांनाही संधी
एआयएफएफने निविदेसाठी तिसरा गट केला आहे. त्यात महापालिका, पालिका ते अगदी ग्रामपंचायत असलेल्या छोट्या गावांनाही संधी आहे. फक्त व्यावसायिक संघासाठी आवश्यक पायाभूत सुविधांची अट त्यासाठी आहे. केरळ, गोवा आणि मणिपूर याठिकाणी मुळातच आय लिग संघ असल्याने इतर राज्यांना प्राधान्य असल्याचे एआयएफएफने जाहीर केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT