9558 -ऋतुजा पाटील
शालेय राष्ट्रीय क्रॉसकंट्रीत
ऋतुजा पाटीलला सुवर्ण
गडहिंग्लज, ता.१६ : येथील महाराणी राधाबाई हायस्कुलची (एमआर) विद्यार्थीनी ऋतूजा विजय पाटील हिने भोपाळ येथे झालेल्या ६६ व्या शालेय राष्ट्रीय स्पर्धेत चार किलोमीटर क्रॉसकट्रीमध्ये सुवर्णपदक पटकाविले.
ऋतुजाचे शालेय शिक्षण साधना हायस्कुलमध्ये झाले. धावण्यातील गती लक्षात घेऊन क्रीडाशिक्षक विनायक नाईक यांनी तिला ॲथलेटिक्सकडे वळण्याचा सल्ला दिला. तिच्या वडिलांची छोटीशी पानटपरी आहे. पालकांनी तिला पोटाला चिमटा लावून प्रोत्साहन दिले. कोरोनाने दोन वर्षे तिच्या धावण्याला ब्रेक लागला. दीड वर्षापुर्वी प्रशिक्षक बिरेंद्र आडसुळे यांच्या मार्गदर्शनाखाली तिने पुन्हा सराव सुरु केला. हंगाम संपल्यानंतर ऐनवेळी या स्पर्धेची घोषणा होऊनही ऋतुजाने पदक जिंकून स्वप्नपूर्ती केली. बारावीचे वर्ष असूनही प्राचार्य संजय कुंभार आणि शिक्षकांचे सहकार्य मिळाल्याचे तिने नमुद केले. ऋतुजाने बारावी विज्ञान शाखेतून ८७ टक्के गुण मिळविले. सीईटीतही तिने ९३ गुण मिळवून घौडदौड केली. रोज पाच तास कसून सराव करूनही तिची शैक्षणिक भरारी अष्टपैलूत्व सिध्द करणारी आहे.
पहिलीच राष्ट्रीय स्पर्धा असल्याने दडपणातही जिद्दीने सुवर्णपदक खेचून आणले. भारताचे प्रतिनिधित्व करण्याची आकांशा आहे. पदवी पुर्ण करून स्पर्धा परीक्षेतून अधिकारी बनण्याचे स्वप्न आहे.
- ऋतुजा पाटील, धावपटू
------------------------------
दीपक कुपन्नावर, गडहिंग्लज.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.