कोल्हापूर

आगाराचा ‘लुक’ बदलू लागला

CD

15241
गडहिंग्लज : आगारात लोकसहभागातून फलाटांच्या दुरुस्तीसह शोभिवंत झाडे लावली जात आहेत. (आशपाक किल्लेदार : सकाळ छायाचित्रसेवा)
--------------------------------------------
आगाराचा ‘लुक’ बदलू लागला
गडहिंग्लजला लोकसहभागातून सुविधा; रंगरंगोटी, कचरा कुंडी, विद्यार्थ्यांसाठी निवारा शेड
दीपक कुपन्नावर : सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १० : येथील आगाराचा लुक बदलू लागला आहे. लोकसहभागातून जागोजागी शोभिवंत झाडांच्या कुंड्या, कचरा कुंड्या आणि रंगरंगोटीमुळे आगाराचे रुपडे पालटले आहे. विद्यार्थ्यांसाठी स्थानकात निवारा शेडही उभाले आहे. निमित्त आहे बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर आगार अभियानाचे. विशेष म्हणजे सर्वसामान्यांसाठी आधारवड असणाऱ्या एसटीसाठी लहान गावापासून, शिक्षण संस्था, बँकाचा मदतीसाठीचा पुढाकार मोलाचा ठरत आहे.
जिल्ह्यात कोल्हापूर, इचलकरंजी पाठोपाठ मोठे आगार म्हणून गडहिंग्लजची ओळख आहे. उपविभागामुळे आगाराचे उत्पन्नही मोठे आहे. पण, काही वर्षे कर्मचाऱ्यांच्या वेतनाशिवाय कोणतेच अनुदान नसल्याने विकासकामे ठप्प आहेत. परिणामी, सीमाभागातली हजारो प्रवाशांची ये-जा असूनही आगाराला अवकळा आली होती. मुलभूत सुविधांअभावी प्रवाशांची गैरसोयी वाढल्या होत्या. या पार्श्वभुमीवर बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर आगार आभियानने विकासकामांना पालवी फुटली आहे.
आगारात सर्वच फलाटावर शोभिवंत झाडांच्या कुंड्या आणि कचरा कुंड्या ठेवल्या आहेत. आगारात साई मंदिर दिशेला विद्यार्थ्यांसाठी निवारा शेड उभारला आहे. हिरकणी कक्षाची दुरुस्ती आणि रंगरंगोटी केली आहे. आगारात महत्वाच्या ठिकाणी फलक लावले आहेत. मोडकळीस आलेल्या फलाटांची दुरुस्ती सुरु आहे. आगार परिसरातील खड्डे बुजवले आहेत. यासाठी विविध शिक्षण संस्था, तालुक्यातील ग्रामपंचायती, बँका, पतसंस्था, सहकारी संस्था यांची मदत घेतली जात आहे. राज्यातील सर्वच आगारात हे अभियान राबवले जाणार आहे. आगारातील सर्वच कर्मचारी, वाहक, चालक यासाठी विशेष प्रयत्नशील आहेत.
-------------------------
नियोजित सुविधा
-आगाराला कमान, प्रवेशद्वार
- संपूर्ण रंगरंगोटी
-पाण्याची टाकी, कपाऊंड दुरुस्ती
-सुचना फलक
-फरशी बसवणे
------------
निधी अभावी आगारातील विकासकामे ठप्प होती. महिनाभरापासून स्वच्छ सुंदर आगार आभियानतंर्गत लोकसहभागातून विकासकामे सुरु केली आहेत. सर्वच घटकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.
- गुरुनाथ रणे, आगारप्रमुख, गडहिंग्लज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : 1,52,85,09,99,296.. राजस्थान रॉयल्सचा सौदा झाला! अमेरिकेतील उद्योजकाने खरेदी केला संघ, IPL मधील सर्वात मोठी डिल

Soft Skills: कॉर्पोरेट विश्वात केवळ 'डिग्री'ला महत्त्व नाही; मॅनेजमेंट विद्यार्थ्यांकडे 'सॉफ्ट स्किल्स' असणे आता अनिवार्य

Latest Marathi News Live Update : अशोक खरात प्रकरण: आज 3.30 वाजता महत्त्वाची सुनावणी

सेम टू सेम! चाकणकर आणि तटकरेंच्या बोटाची दुखापत अन् कारणही एकच; किती मोठा हा योगायोग? अंधारेंचा सवाल

IPL 2026 Marathi News: रवींद्र जडेजाचा 'तो' फोटो, साक्षीची Video शूटींग अन् MS Dhoni फक्त रडायचाच बाकी होता, Viral Moment

SCROLL FOR NEXT