कोल्हापूर

सागर पोवार यांनी आभार मानले.

CD

फोटो क्रमांक: gad293.jpg

80543
गडहिंग्लज : युनायटेड फुटबॉल असोसिएशनच्या व्याख्यानात मंगेश देसाई यांचा सत्कार करताना महादेव पाटील. (छायाचित्र : अनिकेत कोले)
..............
फुटबॉल करिअर संधी वाढल्या

मंगेश देसाई : युनायटेड उन्हाळी प्रशिक्षण शिबिर खेळाडूंना मार्गदर्शन

सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २९ : ‘गेल्या दशकभरात भारतीय फुटबॉलने कात टाकली आहे. इंडियन सुपर लीगमुळे (आएएसएल) व्यावसायिकता वाढली आहे. इंडियन फुटबॉल लीगच्या (आय लीग) तीन श्रेणी झाल्या आहेत. त्यामुळेच फुटबॉल क्षेत्रात केवळ खेळाडू म्हणूनच नव्हे तर प्रशिक्षक, संघ व्यवस्थापक अशा दीड डझनहून अधिक करिअरच्या संधी वाढल्या आहेत,’ असे प्रतिपादन भोपाळच्या लेक फुटबॉल क्लबचे मुख्य प्रशिक्षक मंगेश देसाई यांनी केले.
येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनमार्फत सुरू असलेल्या उन्हाळी मोफत प्रशिक्षण शिबिरात ‘फुटबॉल करिअर’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. एम. आर. हायस्कूलच्या सभागृहात कार्यक्रम झाला. युनायटेडचे सचिव दीपक कुपन्नावर यांनी प्रास्ताविकात देसाई यांनी अखिल भारतीय फुटबॉल महासंघ (एआयएफएफ), वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (विफा) याठिकाणी डेव्हलपमेंट ऑफिसर, तर रियल काश्मीर या आय लीग संघाचे तांत्रिक संचालक म्हणून केलेल्या कार्याची माहिती दिली. यावेळी लेक सिटीचे संचालक राज हंस, युनायटेडचे खजिनदार महादेव पाटील, तानाजी देवेकर, सुलतान शेख उपस्थित होते.
देसाई म्हणाले, ‘यावर्षीपासून तृतीय श्रेणी आय लीग स्पर्धा एआयएफएफने सुरू केली आहे. महत्त्वाचे म्हणजे यात प्रत्येक राज्यातील लीग विजेत्या संघाला स्थान दिल्याने पूर्वी केवळ बंगाल, गोवा आणि केरळपुरता मर्यादित असणारा फुटबॉल देशभरात सर्वत्र पोहोचतो आहे. यामुळे व्यावसायिक फुटबॉल खेळणाऱ्या संघांची संख्या दीडशेहून अधिक झाली. त्यात फुटबॉलपटू, पंच, प्रशिक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, फिजीओ, सामना विश्लेषक, माध्यम व्यवस्थापक, ट्रेनर, अकादमी प्रशिक्षक, सहायक अशी प्रत्येक संघात दीड डझनहून अधिक संधी आहेत.’ यश पाटील यांनी सूत्रसंचालन केले. सागर पोवार यांनी आभार मानले.
.....
चौकट...
फुटबॉलशी स्नेह कायम ठेवा
नवोदितांनी खेळाडू म्हणून कारकीर्द जरूर घडवावी. मनापासून मेहनत, शिस्त, समर्पण यातून ते साकारू शकेल; पण त्यानंतरही पंच, प्रशिक्षकापासून व्यवस्थापक, पुरस्कर्ता, खेळाचा हितचिंतक अशा कोणत्याही स्तरावर फुटबॉलशी शेवटच्या श्वासापर्यंत स्नेह कायम ठेवण्याचे वचन देसाई यांनी उपस्थित खेळाडूंकडून घेतले.
....................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supriya Sule: ‘कर्जमाफी अन् सातबारा कोरा होईपर्यंत स्वस्थ बसू देणार नाही’; पंढरपुरात सुप्रिया सुळे आक्रमक, तुरुंगात जावे लागले तरी चालेल

'अंबा येडू दोघी बहिणी…’ ऐश्वर्या नारकरांसोबत लेकीचाही ठसकेबाज डान्स! VIDEO VIRAL

Asian Games, IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कशी असू शकते Playing XI? कुठे पाहाणार उपांत्यपूर्व सामना?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक पेपरफुटीप्रकरणी मोठी अपडेट

सरकारने माझ्या मागण्या मान्य केल्या, ३० दिवसांचा रिचार्ज, डेटाशिवाय प्लान मिळणार; राघव चड्ढांची पोस्ट

SCROLL FOR NEXT