कोल्हापूर

माकडाची उडी, मुलाचा जीव गेला

CD

फोटो : मृत संकेत पाटील
...
माकडाने समोरच उडी मारली...
अन्‌ संकेत जीवाला मुकला
हिटणीमधील घटना : दुर्दैवी मृत्यूने हळहळ
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २९ : ‘तो’ मित्रांसमवेत क्रिकेट खेळत होता. त्याच्या समोरच माकडाने उडी मारली. तो दचकला आणि भीतीने धक्का बसून बेशुद्ध पडला. दवाखान्यात नेले, परंतु तो तत्पूर्वीच जीवाला मुकला होता.
ही दुर्दैवी घटना हिटणी (ता. गडहिंग्लज) येथे शेतवडीत घडली. संकेत सुनील पाटील (वय ७) असे या दुर्दैवी मुलाचे नाव आहे. मंगळवारी (ता. २८) सायंकाळी उशिरा ही घटना घडली. संकेतच्या या मृत्यूने संपूर्ण गाव हळहळत आहे.
याबाबतची माहिती अशी, शाळांची उन्हाळी सुटी अजून सुरू आहे. या सुटीतील मुलांचा हमखास खेळ म्हणजे क्रिकेट. हिटणीतील संकेत हाही आपल्या मित्रांसमवेत क्रिकेट खेळायला गेला. वरदापगोळ वसाहतीत संकेतचे घर आहे. शेजारीच असलेल्या शेतवडीत ही मुले क्रिकेट खेळत होती. उशीर झाल्याने खेळ बंद करून इतर मुले घराकडे जाऊ लागली. संकेत हा बॉल आणण्यासाठी मागे राहिला. बॉल घेण्यास गेलेल्या संकेतच्या समोरच अचानक मोठ्या माकडाने उडी मारली अन्‌ संकेत मोठ्याने किंचाळला.
दरम्यान, घराकडे जाणारी मुले व शेजारीच असलेले लोक धावून गेले. तोपर्यंत तो निपचित पडला होता. त्याला उठवण्याचा प्रयत्न केला असता तो उठला नाही. यामुळे त्याला तातडीने संकेश्वर येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले, पण तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेने घाबरून त्याला हृदयविकाराचा धक्का बसला असावा आणि तो त्यातच मृत्युमुखी पडला असण्याची श्यक्यता डॉक्टरांनी वर्तविली. संकेतचे आई-वडील शेती करतात. संकेतला एक मोठा भाऊ आहे. संकेत पहिलीत शिकत होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd ODI : शुभमन गिलचे सलग दुसरे शतक! रोहित शर्माची त्याचदिशेने वाटचाल, पण, मोडला सचिनचा विक्रम, जगात दुसरा नंबर

Interest Rate: PPF-Sukanya योजनेत पैसे गुंतवलेत? बचत करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! PPFसह या योजनांचे व्याजदर कायम; पाहा कुठे मिळतं 8.2% व्याज

Pune Crime: बिग बॉस’फेम दिव्या शिंदेची पोलिस कोठडी वाढली; डॉ. गायकवाड हल्ला-खंडणी प्रकरणात १७ जणांचा सहभाग निष्पन्न

IND vs WI 2nd ODI : रोहित शर्मा, शुभमन गिल यांचा १० षटकांतच वर्ल्ड रेकॉर्ड! जगात भारी टीम इंडियाचे कारभारी; विडींजला रडकुंडीला आणले

Kannad Sugarcane Fire: दुष्काळात कष्टाने जगविलेला ऊस विद्युत तारेने जाळला; कन्नडमध्ये शेतकऱ्याचे अडीच लाखांचे नुकसान

SCROLL FOR NEXT