कोल्हापूर

बाहुबलीची प्रो-कबड्डीतून माघार

CD

19507
सिद्धार्थ देसाई
......
बाहुबलीची प्रो-कबड्डीतून माघार

सिद्धार्थ देसाईच्या निर्णयाने चाहत्यांना धक्का

सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १७ : प्रो-कबड्डीच्या उद्या (ता. १८) पासून सुरू होणाऱ्या ११ व्या अध्यायाची सर्वांना उत्कंठा लागून राहिली आहे. पण, अनुभवी ‘बाहुबली’ सिद्धार्थ देसाई (हुंदळेवाडी, ता. चंडगड) याने या स्पर्धेतून वैयक्तिक कारणासाठी माघार घेतली आहे. तो यंदा दिल्ली दंबग संघाकडून मैदानात उतरणार होता. त्याच्या या अनपेक्षित निर्णयाने त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.
मराठमोळ्या कबड्डीचे प्रो-कबड्डीने रूपच पालटले आहे. या स्पर्धेच्या अकराव्या अध्यायाचा नारळ उद्यापासून हैदराबादमध्ये फुटणार आहे. पहिला टप्पा हैदराबाद, तर दुसरा नोएडा आणि तिसरा पुण्यामध्ये रंगणार आहे. बारा संघानी यासाठी जय्यत तयारी केली आहे. विजेतेपदापची हॅटट्रिक केलेला पटना पायसटस, जयपूर पिंक पँथर्स आणि गतविजेता पुणेरी पलटण यांच्या कामगिरीकडे लक्ष वेधून आहे. स्पर्धेतील महाराष्ट्राचे एकमेव प्रशिक्षक असणाऱ्या प्रशांत सुर्वे यांच्या बंगाल वॉरियर्सच्या कामगिरीचीही उत्सुकता आहे; पण यात कबड्डी वर्तुळाचे लक्ष वेधले ते सिद्धार्थ देसाईच्या माघारीच्या निर्णयाने.
सहा वर्षांपूर्वी यू मुंबा संघातून पर्दापण करणाऱ्या सिद्धार्थने आक्रमक खेळाद्वारे अल्पावधीत ओळख निर्माण केली. धडाकेबाज खेळामुळे ‘बाहुबली’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिद्धार्थला तेलगू टायटन्सने तब्बल कोटी रुपये बोली लावून त्याच्या प्रतिभेला दाद दिली. तीन हंगामांनंतर गतवर्षी तो हरियाना स्टिलर्सकडून खेळला. यंदा दिल्ली दबंगने त्याला २६ लाख रुपयांना करारबद्ध केले होते; पण स्पर्धेचा नारळ फुटण्यापूर्वीच त्याने माघार घेतल्याने चाहत्यांना धक्का बसला आहे.
.....
चौकट...
सिद्धार्थची कामगिरी
संघ*गुण
यू मुंबा*२१८
तेलगू टायटन्स* २१७
तेलगू टायटन्स*३४
तेलगू टायटन्स*१४२
हरियाना स्टिलर्स*८२
.....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salary Account vs Savings Account Benefits : दर महिन्याला पगार येतो? मग सॅलरी अकाउंटचे हे १० मोठे फायदे तुम्हाला माहीत असलेच पाहिजेत!

Mumbai Indians च्या कोचने रचला इतिहास! किरॉन पोलार्डने ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये भूकंप आणला...

Share Market Crash: शेअर बाजारात हाहाकार! सेन्सेक्स 1,438 अंकांनी कोसळला; गुंतवणूकदारांचे 5.24 लाख कोटी बुडाले

चाणक्य नीतीनुसार आयुष्यात मोठे संकट येण्यापूर्वी दिसतात 'ही' ५ लक्षणे; वेळेवर ओळखा आणि सावध व्हा!

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगे पुन्हा आक्रमक; महाराष्ट्र दौऱ्याची घोषणा; काय केले आवाहन?

SCROLL FOR NEXT