कोल्हापूर

घाळी फुटबॉल लीग

CD

स्थानिक शालेय संघांची कसोटी
घाळी फुटबॉल लीग : बेळगाव, कोल्हापूरशी लढत; शौकिनांचे लक्ष वेधून

सकाळ वृत्तसेवा

गडहिंग्लज, ता. ७ : डॉ. घाळी शालेय फुटबॉल लीगमध्ये उद्या (ता. ८) स्थानिक संघांची कसोटी आहे. बेळगावचा सेंट झेवियर्स, केंद्रीय विद्यालयासह कोल्हापूरचा महाराष्ट्र हायस्कूल, कुडाळ हायस्कूलशी लढावे लागणार आहे. त्यामुळे येथील शालेय फुटबॉलपटूंच्या कामगिरीकडे शौकीनांचे लक्ष वेधून आहे. एम. आर. हायस्कूलच्या मैदानावर हे सामने होतील.
डॉ. घाळी लीग स्पर्धेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त यंदापासून स्पर्धेचे स्वरूप स्थानिक साखळी आणि बाद पध्दतीने केले आहे. दोन गटांत दहा संघांत साखळी पध्दतीने सामने झाले. यातून ‘अ’ गटात साधना हायस्कूलने चारही सामने जिंकत १२ गुणांसह अव्वल स्थान मिळविले. जागृती हायस्कूल, गडहिंग्लज हायस्कूलचे दोन विजय आणि एक बरोबरीमुळे प्रत्येकी सात गुण असले तरी सरस गोल फरकावर जागृती बाद फेरीसाठी पात्र ठरला. ‘ब’ गटात होरायझन स्कूलने एकतर्फी तीन सामन्यांत नऊ गुण मिळवत आरामात बाद फेरी गाठली. क्रिएटिव्ह, वि. दि. शिंदे आणि शिवराज स्कूल केवळ एकच विजयामुळे प्रत्येकी तीन गुणांवर राहिले. परंतु, सरस गोल फरकावर शिवराज नशीबवान ठरला.
महाराष्ट्र हायस्कूलचे राज्यस्तरावर वर्चस्व असून दरवर्षी डझनहून अधिक खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवडले जातात. सेंट झेवियर्सने यंदाच्या राज्यस्तरीय स्पर्धेत तृतीय क्रमांक, तसेच दोन वर्षापूर्वी राष्ट्रीय स्तरावर सुब्रतो स्पर्धेत निवडला गेला होता. केंद्रीय विद्यालयाने कॅथोलिक, शिरगुपकर, मैदानी स्पर्धेचे विजेतेपद मिळविले आहे. या संघांसमोर स्थानिक संघांची खरी कसोटी आहे. सकाळच्या सत्रात उपात्यंपूर्व तर दुपारी उपांत्य फेरीचे आणि सायंकाळी अंतिम सामना होईल.


चौकट...
महाराष्ट्र, कर्नाटक आमनेसामने
महाराष्ट्राच्या शालेय फुटबॉलमध्ये मुंबईला कोल्हापूरचे तर कर्नाटकात अव्वल बंगळूरला बेळगावचे तगडे आव्हान आहे. त्यामुळे दोन्हीं राज्यातील अव्वल संघ या स्पर्धेच्या निमित्ताने आमनेसामने येणार आहेत. साहजिकच या दोन केंद्रातील बाजीगर कोण याचा फैसला उद्या होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News: पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला शिक्षकाकडून बेदम मारहाण; जिल्हा परिषद शाळेतील संतप्त प्रकार, प्रकरण दडपण्याचा प्रयत्न

Junnar Crime : लग्नास नकार; जुन्नरमध्ये विद्यार्थिनीवर तरुणाचा कोयत्याने हल्ला, विद्यार्थिनी गंभीर जखमी

Hardik Pandya: हार्दिक पांड्याविरोधात पुणे पोलिसात तक्रार; तिरंग्याचा अवमान केल्याचा आरोप

Cyber Crime : दहा कोटींच्या सायबर फसवणूकप्रकरणी सोलापूरमधून आरोपीला अटक

Monalisa Marriage: मुस्लिम तरुणासोबत लग्न केलं; पण वडिलांची भीती, घाबरलेल्या मोनालिसाची पोलिसात धाव अन्... व्हायरल गर्ल पुन्हा चर्चत

SCROLL FOR NEXT