कोल्हापूर

फायनल विश्व करंडक फुटबॉल कॉलम

CD

कॉर्नर किक

दीपक कुपन्नावर


आफ्रिकेने केली
कोरियाची शिकार


दक्षिण आफ्रिकेने बाद फेरीचा प्रबळ दावेदार आशियाई ‘पॉवर हाऊस’ दक्षिण कोरियाला नमवून ऐतिहासिक कामगिरी केली. दक्षिण कोरियाचे प्रशिक्षक हॉग म्यू बोंग यांचा हुकमी एक्का कर्णधार सॉन हयुग मीन याला उत्तरार्धात मैदानात उतरविण्याचा डाव अंगलट आला.
ताकदीच्या खेळावर भर देणारे आफ्रिकन खेळाडू मध्यंतरानंतर दमतील, त्याचा फायदा घेण्यासाठी मीनला उत्तरार्धात उतरविण्याची त्यांची व्यूहरचना सपशेल फसली. अंतिम टप्प्यात कोरियाने बरोबरीसाठी सर्वस्व पणाला लावले; पण गोलचे टॉनिक मिळालेल्या दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार गोलरक्षक रॉनवेन विल्मस याने चिवट खेळ करून बरोबरीचे मनसुबे उधळून लावले. सामनावीर तपोलो मसेको याने निर्णायक गोल करून ऐतिहासिक कामगिरीत सिंहाचा वाटा उचलला. त्यामुळे कोरियावर हताश होण्याची वेळ आली आहे.
‘हेक्सा’ अर्थात सहाव्यांदा विश्वकरंडक पटकावण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या ब्राझीलने स्कॉलंडला तीन गोलने हरवून दबदबा राखला. प्रत्येक सामन्यात गोल करीत व्हिनिसियस ब्राझीलचा प्रमुख आधारस्तंभ बनतो आहे. अडीच वर्षांनी पुनरागमन करणाऱ्या नेमारमुळे ब्राझीलच्या आक्रमणाचा तोफखाना अधिक मजबूत होतो का, हे पाहणे औत्सुक्याचे आहे. हैतीवर मात करताना गत स्पर्धेतील डार्क हॉर्स ठरलेल्या मोरोक्कोने कामगिरीत सातत्य राखून बाद फेरीची उत्सुकता वाढविली आहे.
शनिवारी शेवटच्या साखळी सामन्यात मुख्यत्वे माजी विजेता इंग्लड, घानाचे प्रत्येकी चार गुण असून, दोघांसाठी ‘करा किंवा मरा’ ही स्थिती असल्याने सामने रंगतील. इंग्लड घानाविरुद्धची मरगळ झटकून पनामाला हरवत आव्हान टिकवतील, अशी अपेक्षा आहे. चाचपडणारा क्रोएशिया घानाचे आव्हान कसे पेलतो, हे पाहणे उत्कंठावर्धक आहे. कोलंबिया विरुद्ध पोर्तुगाल सामन्यातून ‘क’ गटाचा विजेता ठरेल. अल्जेरिया आणि ऑस्ट्रिया यांच्यात रोमांचक लढतीची अपेक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT