कोल्हापूर

कबड्डीच्या सहा नियमात बदल

CD

03050
संग्रहित छायाचित्र.
--
कबड्डीच्या सहा नियमात बदल
नव्या हंगामात अंमलबजावणी : खेळाची रंगत आणखी वाढण्याची अपेक्षा
दीपक कुपन्नावर : सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ३ : मऱ्हाटमोळ्या कबड्डीच्या सहा नियमात बदल केला आहे. हौशी कबड्डी राष्ट्रीय महासंघाने याची घोषणा केली आहे. बदली खेळाडू, लॉबी आऊट, शिस्तबद्ध कार्ड, पाठलाग, टायब्रेकर, तिसरे आणि चौथे स्थान याबाबतच्या नियमात यंदा बदल केले आहेत. नव्या हंगामात याची अंमलबजावणी होणार आहे. सहा नियमातील बदलाने खेळाची रंगत आणखी वाढण्याची अपेक्षा आहे.

सहा नियम असे-
१) बदली खेळाडू
बदली खेळाडूबाबत प्रत्येक संघाला आता अधिकाधिक पाचवेळा खेळाडू बदली करण्याची संधी मिळणार आहे. एका बदलीच्या संधीत सात ते नऊ खेळाडू बदलता येतील. संपूर्ण सामन्यात कधीही संघ व्यवस्थापन पंचाना कल्पना देऊन खेळाडू बदलू शकतील. पूर्वी केवळ टाईम आऊट आणि मध्यतंरालाच खेळाडू बदलता येत होते.

२) पाठलाग
परतणाऱ्या चढाईपटूचा पाठलाग करण्याच्या नियमातही बदल करण्यात आला आहे. रिकामी चढाई, स्पर्श चढाई, चढाईपटू आणि बचाव पटूतील झटापटी वेळीच बचाव पटूंना परत जाणाऱ्या चढाई पटूचा पाठलाग करता येईल. चढाईपटू जेव्हा बोनस गुण घेण्यास प्रयत्नशील असेल तेव्हा मात्र चढाईपटूचा पाठलाग करता येणार नाही.

३) लॉबी नियम
चढाईपटूने कोणत्याही बचावपटूला वैध स्पर्श न करता लॉबीमध्ये प्रवेश केल्यास तो खेळाडू ‘सेल्फ आऊट’ घोषित केला जाईल. या स्थितीत केवळ चढाईपटूच बाद होईल. त्यानंतर बचावपटू जर लॉबीमध्ये गेले तरी ते सुरक्षित मानले जातील, त्यांना बाद मानले जाणार नाही. यापूर्वी लॉबीमध्ये प्रवेश करणाऱ्या चढाईपटूबरोबरच बचाव पटूंनाही बाद ठरवले जात होते.

४)टाय- ब्रेकर नियम
सामना निर्धारित वेळेत बरोबरीत सुटल्यास टाय ब्रेकरचा अवलंब केला जातो. या टायब्रेकरमध्ये चढाईपटूला आता केवळ बॉक रेषा ओलांडल्यास गुण मिळणार नाहीत. नव्या बदलात चढाईपटूला गुणासाठी बोनस लाईन ओलांडणे अत्यावश्यक करण्यात आले आहे. टाय ब्रेकरमधील सर्वच्या सर्व पाच चढाया डू ऑर डाय स्वरुपाच्या म्हणजेच प्रत्येक चढाईत निकाल लागणे गरजेचे राहणार आहे.
-
५) शिस्तबद्ध कार्ड
अवैध खेळणाऱ्या खेळाडूस पंच पिवळे किंवा लाल कार्ड दाखवून ताकीद द्यायचे. याबद्दल प्रतिस्पर्धी संघाला तांत्रिक गुण बहाल केला जात होता. आता नव्या बदलात खेळाडूला कार्ड दाखवल्यास प्रतिस्पर्ध्याला तांत्रिक गुण मिळणार नाही. पिवळ्या कार्डासाठी सदरच्या खेळाडूला दोन मिनिटांसाठी खेळातून निलबिंत ठेवले जाईल.
-
६) तिसरे व चौथे स्थान
उपांत्य फेरीतील पराभूत संघातून तिसरा आणि चौथा क्रमांक ठरविला जातो. हा निर्णय नाणेफेकीवर घेतला जाणार नाही. स्पर्धेतील विजेत्या संघाकडून पराजित होणारा संघ तिसरा तर उपविजेत्याकडून पराभूत होणाऱ्या खेळाडूस चौथा क्रमांक दिला जाईल. नाणेफेकीने नाशिबाची कौल मिळविण्याचा मार्ग नव्या बदलाने बंद झाला आहे.

-
आशियाई यशाने चैतन्य
भारताने जपानमध्ये झालेल्या २० आशियाई स्पर्धेत पुरुष आणि महिला या दोन्ही गटात इराणचा पाडाव करून सुवर्णपदक पटकावत हुकूमत कायम राखली. महाराष्ट्राच्या अस्लम इनामदार, सोनाली शिंगटे यांनी विजेतेपदात मोलाचा वाटा उचलला. या सोनेरी यशामुळे कबड्डीक्षेत्रात चैतन्याचे वातावरण आहे.

-
कोट...
‘‘कबड्डी महासंघाने बदली खेळाडू, लॉबी आणि पाठलाग या नियमांत महत्त्‍वपूर्ण बदल केले आहेत. बदलीसाठी अधिक संधी दिल्याने नव्या दमाचे खेळाडू मैदानात येतील. चढाईपटू आणि बचावपटू दोघांसर्दभात बदल असल्याने सामन्यातील समतोल कायम राहणार आहे.’’
- कुबेर पाटील, राष्ट्रीय पंच, किणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ambajogai Robbery Case : अंबाजोगाईतील 'हायप्रोफाईल' घरफोडीचा एलसीबीकडून छडा; फरार म्होरक्याला बेड्या, कोट्यवधींचा ऐवज जप्त

Otur News : खासगी क्लासेसवर अंकुश कोणाचा? कठोर पावले उचलण्याची गरज

Asian Games: शेवटच्या दिवशी ५ GOLD! कुमकुम, अमन, प्रणवीपाठोपाठ हॉकी-क्रिकेट संघांची सुवर्ण कामगिरी; भारताच्या खात्यात ८५ मेडल्स

Beed News : उच्च पगाराचे आमिष! म्यानमारच्या सायबर नरकात अडकल्या ३२ मराठी जिवांची होणार सुटका; बीडच्या स्वप्नील काळुंकेसह भारतीयांसाठी म्यानमार सरकार करणार 'रेस्क्यू ऑपरेशन'

Pune News : पुणे शहरातील २४ संवेदनशील ठिकाणी अंधाराचे साम्राज्य

SCROLL FOR NEXT